Join us

गर्भवती ईशा देओलने समर आउटफिटमधील फोटो केला शेअर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2017 20:54 IST

अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल सध्या गर्भवती आहे. नुकतीच ईशा बेबीमूनकरीता पती भरत तख्तानी यांच्याबरोबर ...

अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल सध्या गर्भवती आहे. नुकतीच ईशा बेबीमूनकरीता पती भरत तख्तानी यांच्याबरोबर ग्रीसला गेली होती. आता ती मुंबईत परतली असून, परिवारासोबत एन्जॉय करताना दिसत आहे. त्याचबरोबर ईशा सोशल मीडियावरही अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. नुकताच तिने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून, फोटोत ती समर आउटफिटमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये रिलॅक्स दिसत असलेल्या ईशाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मुंबईमध्ये किती गर्मी आहे, बरखा रानी तुम कहा हो?’ सध्या ईशा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह झाली असून, ती सातत्याने फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत आहे. दरम्यान ईशाच्या लग्नाला पाच वर्ष पुर्ण झाले असून, या दोघांमध्ये लवकरच तिसºया पाहुण्यांचे आगमन होणार आहे. २९ जून २०१२ रोजी ईशाने उद्योगपती भरत तख्तानी याच्याशी मुंबई येथील इस्कॉन मंदिरात लग्न केले होते. ईशा गर्भवती असल्याची बातमी एप्रिल २०१७ मध्ये समोर आली होती. राम कमल मुखर्जी यांनी ईशा गर्भवती असल्याचे कन्फर्म केले होते. राम कमल मुखर्जी हेमा मालिनी यांच्या दुसºया ‘बेयोंड द ड्रीम गर्ल’ या पुस्तकाचे लेखक आहेत. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी दुसºयांना आजी-आजोबा बनणार आहेत. या अगोदर त्यांची लहान मुलगी अहाना हिने डेरेन नावाच्या मुलाला जन्म दिला. वृत्तानुसार ईशाला लहान मुले खूपच आवडतात. जेव्हा तिची लहान बहीण अहाना गर्भवती होती, तेव्हा तिनेही सर्व प्लानिंग आणि शॉपिंग केली होती. दरम्यान ईशा आई हेमा मालिनेकडे जुहू येथे राहत आहे. मात्र अधुन-मधून ती सासरवाडी बांद्रा येथेही जात असते. या वर्षाच्या अखेरपर्यंत ईशाच्या आयुष्यात चिमुकला पाहुणा येण्याची शक्यता आहे. दरम्यान ईशा गर्भवती असल्याने देओल आणि तख्तानी परिवारात आनंदाचे वातावरण आहे.