Join us

प्रेग्नंट आहे अभिनेत्री बिपाशा बासू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2017 10:18 IST

बॉलिवूडची बेगम करीना कपूर खान आई बनल्यानंतर आता आणखी एक बॉलिवूडची अभिनेत्री आई बनणार आहे.बॉलिवूडची बंगाली बाला अर्थात अभिनेत्री ...

बॉलिवूडची बेगम करीना कपूर खान आई बनल्यानंतर आता आणखी एक बॉलिवूडची अभिनेत्री आई बनणार आहे.बॉलिवूडची बंगाली बाला अर्थात अभिनेत्री बिपाशा बासू लवकरच आई बनणार आहे.बिपाशा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये रंगल्या आहेत. बी-टाऊनच नाही तर सोशल मीडियावरही बिपाशाच्या प्रेग्नसीबाबत चर्चा सुरु आहेत.या चर्चांना कारण ठरलं आहे ते सोशल मीडियावरील काही फोटो. बिप्सचे हे फोटो पाहून कुणीही चटकन अंदाज लावू शकतो की ती प्रेग्नंट आहे.फोटोमध्ये बिपाशा पती करणसिंह ग्रोव्हरसोबत असल्याचं पाहायला मिळत आहे.विशेष म्हणजे यावेळी बिपाशा आपल्या पोटाला बॅगच्या साहाय्याने लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे या फोटोत स्पष्टपणे पाहायला मिळतंय.त्यातच प्रेग्नसीबाबत बी-टाऊन आणि सोशल मीडियावर इतक्या चर्चा रंगल्या असताना बिपाशा बासूकडून या चर्चांचं खंडनही करण्यात आलेलं नाही.बिपाशाच नाही तर तिचा पती करणसिंह ग्रोव्हर यानेही याबाबतच्या वृत्ताबाबत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.याचाच अर्थ की बिपाशा आणि करणच्या आयुष्यात कुणीतरी येणार आहे.त्या स्पेशल व्यक्तीच्या आगमनाची गोड बातमी देण्यासाठी कदाचित बिप्स आणि करण एखाद्या चांगल्या मुहूर्ताची वाट तर पाहात नाहीत ना ?बिपाशा व करण या दोघांनी सुमारे वर्षभराच्या रिलेशनशिपनंतर गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात लग्नबंधनात अडकले होते.३० एप्रिल २०१६ रोजी बिप्स व करणचा विधिवत विवाह पार पडला होता. या लग्नाला बॉलिवूडच्या बड्या कलाकारांनी हजेरी लावली होती.