Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्विमसूट घालून पूलमध्ये प्रेग्रेंसी एन्जॉय करतेय अनुष्का शर्मा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 19:40 IST

विराट आणि अनुष्काने त्यांच्या घरी जानेवारी 2021मध्ये पाळणा हलणार असल्याचे सांगितले होते.

अनुष्का शर्मा सध्या आपला प्रेग्नेंसी टाईम एन्जॉय करते आहे. प्रेग्नेंसीची अनाऊंसमेंट केल्यानंतर अनुष्काने बेबी बंपसोबतचा फोटो शेअर केला होता. नुकताच अनुष्काने तिचा स्विमसूट मधला फोटो शेअर केला आहे. या फोटोत अनुष्का ब्लॅक कलरच्या स्विमसूटमध्ये बेबी बंप दाखवताना दिसतेय. प्रेग्नेंसीचा ग्लो सुद्धा अनुष्काच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो आहे.  

हा फोटो शेअर करताना अनुष्काने लिहिले, ''त्या सगळ्यांचे आभार ज्यांनी माझ्यावर दया दाखवली आणि या जगात चांगल्या गोष्टी आहेत यावर मला विश्वास ठेवण्यासाठी प्रेरित केले. - राम दास'' 

ऑगस्ट महिन्यात विराट आणि अनुष्काने त्यांच्या घरी जानेवारी 2021 ला नवा पाहुणा येणार असल्याचे सांगितले होते. विराट आणि अनुष्कानं एक छान फोटो शेअर केला आहे. 'आम्ही दोनाचे तीन झालोय,' असं दोघांनी ट्विटमध्ये म्हटलं होते.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर अनुष्का शर्मा शेवटची शाहरूख खान अभिनीत झिरोमध्ये झळकली होती. यात कतरिना कैफदेखील मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर अनुष्काने आपले पूर्ण लक्ष चित्रपट आणि वेबसीरिजच्या निर्मितीकडे केंद्रीत केले. तिच्या प्रोडक्शन हाउसची नुकतीच बुलबुल ही वेबफिल्म रिलीज झाली.  

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली