Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रेग्नेंट अनुष्का शर्मा जिममध्ये दिसली वर्कआउट करताना, शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 20:30 IST

अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अनुष्का जिममध्ये वर्कआउट करताना दिसते आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा लवकरच आई बनणार आहे. या दोघांसोबत त्यांचे चाहतेही नवीन पाहुण्याबाबत उत्सुक आहेत. अनुष्का नेहमी सोशल मीडियावर तिचे फोटो व व्हिडीओच्या माध्यमातून बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत असते. अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अनुष्का जिममध्ये वर्कआउट करताना दिसते आहे. या व्हिडीओत अनुष्काच्या चेहऱ्यावर ग्लो पहायला मिळतो आहे.

अनुष्का शर्माचा हा व्हिडीओ वूम्प्लाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओवर चाहते खूप कमेंट करत आहेत आणि रिएक्शन देत आहेत. या व्हिडीओत ती व्हाइट टॉपमध्ये दिसते आहे. 

अनुष्का शर्माची प्रसुती जानेवारी महिन्यात होणार आहे. आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मावेळी हजर असावे यासाठी तो भारतात परतला आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्माची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यावेळी दोघे जाहिरातीचे शूटिंग करत होते. यापूर्वी विराटने कोणत्या अभिनेत्रीसोबत काम केले नव्हते. त्यामुळे तो सेटवर अनुष्का शर्मासमोर खूप नर्व्हस झाला होता. या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान विराट आणि अनुष्कामध्ये फ्रेंडशीप झाली आणि मग ते दोघे एकमेकांना भेटू लागले. काही कालावधीपर्यंत दोघांनी एकमेकांना डेट केले आणि २०१७ साली दोघांनी इटली मध्ये लग्न केले.

अनुष्का शर्माने ११ डिसेंबरला लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसाला तिने विराट कोहलीसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला होता.

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली