Join us

प्रीती-सुझानचा नाईट आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 12:44 IST

प्रीती झिंटा लग्नानंतर सध्या भारतात आली आहे. भारतात आल्यानंतर तिने तिच्या पतीसोबत ताज महालला भेटही दिली होती. सध्या प्रीतीचा ...

प्रीती झिंटा लग्नानंतर सध्या भारतात आली आहे. भारतात आल्यानंतर तिने तिच्या पतीसोबत ताज महालला भेटही दिली होती. सध्या प्रीतीचा पती जेन गुडइनफ आपल्या मायदेशी परतला आहे. जेन भारतात नसल्याने प्रीती आपल्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहे. प्रीती आणि सुझान खान यांना नुकतेच मुंबईतील एका हॉटेलमध्ये एकत्र पाहाण्यात आले. त्या दोघी डिनर करून हॉटेलमधून निघत होत्या. सुझान ही प्रितीची खूप चांगली फ्रेंड आहे. ती प्रितीच्या लग्नासाठी अमेरिकेलाही गेली होती.