Join us
Daily Top 2Weekly Top 5

​प्रीतिला मिळाला नवा मित्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 17:30 IST

नुकतेच मुंबईत लग्नाचे ग्रँड रिसेप्शन देणारी अभिनेत्री प्रीति झिंटा हिला एक नवा मित्र मिळालाय..होय, विश्वास ठेवा. इंस्टाग्रामवर प्रीतिने या ...

नुकतेच मुंबईत लग्नाचे ग्रँड रिसेप्शन देणारी अभिनेत्री प्रीति झिंटा हिला एक नवा मित्र मिळालाय..होय, विश्वास ठेवा. इंस्टाग्रामवर प्रीतिने या तिच्या नवा मित्राचा आणि तिचा एक सुरेख व्हिडिओही पोस्ट केला आहे. आता नवे नवे लग्न झालेल्या प्रीतिच्या आयुष्यात अचानक मित्र कुठून टपकला, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण तसे बिसे काहीही नाही हं...प्रीतिचा हा नवा मित्र म्हणजे एक मोर आहे. व्हिडिओ प्रीति मोराला दाणे भरवतांना दिसतेयं. हा माझा नवा मित्र असल्याचेही तिने म्हटले आहे. गत २९ फेबु्रवारीला प्रीतिने तिचा अमेरिकन बॉयफ्रेन्ड जेन गुडइनफ याच्याशी लग्न केले होते. काही मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला होता. यानंतर प्रीतिने टिष्ट्वटरवर लग्नाची बातमी चाहत्यांशी शेअर केली होती. सध्या प्रीति भारतात आहे. ऋषीकेश इथे ती हॉलीडे एन्जॉय करतेय...