Join us

प्रकाश झा म्हणाले, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ म्हणजे बुरसटलेल्या विचारांना झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2017 16:06 IST

बहुचर्चित ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने ग्रीन सिग्नल देण्यास सपशेल नकार दिल्याने बॉलिवूडकरांनी सेन्सॉरवर टीकेची एकच ...

बहुचर्चित ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने ग्रीन सिग्नल देण्यास सपशेल नकार दिल्याने बॉलिवूडकरांनी सेन्सॉरवर टीकेची एकच झोड उठविली होती. जेव्हा याविषयी निर्माता प्रकाश झा यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ म्हणजे भारतातील बुरसटलेल्या विचारधारेच्या लोकांना झटका असल्याचे म्हटले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अलंकृता श्रीवास्तव यांनी केले असून, गेल्या २३ फेब्रुवारी रोजी सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाला प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता.  ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ एका छोट्या शहरात राहणाºया चार महिलांची कथा आहे. जे जगण्यासाठी स्वातंत्र्याचा शोध घेत आहे. सिनेमात कोंकणा सेन- शर्मा, रत्ना पाठक- शाह, विक्रांत मैसी, अहाना कुमरा, प्लाबिता बोरठाकूर आणि शशांक अरोडा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याविषयी एका न्यूज एजन्सीशी बोलताना प्रकाश झा म्हणाले की, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ एक अप्रतिम सिनेमा आहे. समाजातील उथळ आणि हुकूमशाही विचारांना या सिनेमातून छेद देण्यात आला आहे. काही महिला जगण्यासाठी अहंकारी पुरुषी मानसिकतेचा कसा विरोध करतात याचे वास्तव सिनेमात दाखविण्यात आले आहे. सीबीएफसीने यास प्रमाणपत्र देण्यास नकार देऊन पुरुषी मानसिकतेच्या लोकांना हा सिनेमा झटका देणारा असल्याचेच एकप्रकारे सिद्ध केले आहे. पुढे बोलताना झा म्हणाले की, जिथे अन्य देश या स्वातंत्र्याचा स्वीकार करून एका उंचीवर स्वत:ला सिद्ध करीत आहेत, तिथे आपला देश अजूनही बुरसटलेल्या विचारातच गुरफटलेला आहे. या सिनेमातून अशा विचारांच्या लोकांवरच बोट ठेवले असून, सेन्सॉर बोर्डानेही त्यास बळकटी दिली आहे. अलंकृता श्रीवास्तव यांनी दिग्दर्शन केलेल्या या सिनेमाने आंतरराष्टÑीय चित्रपट महोत्सवांमध्ये अनेक पुरस्कारांची लयलूट केली आहे. मियामी, एम्सटरडम, पॅरिस आणि लंडन येथील चित्रपट महोत्सवांमध्ये हा सिनेमा दाखविण्यात आला आहे.