प्राची म्हणते, ‘तो’ क्षण भावूक करणार होता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2016 17:49 IST
‘अजहर’ या माजी क्रिकेटपटू मोहम्मद अजहरूद्दीन याच्या आयुष्यावर बेतलेल्या बायोपिकमध्ये अभिनेत्री प्राची देसाई हिचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या चित्रपटात ...
प्राची म्हणते, ‘तो’ क्षण भावूक करणार होता
‘अजहर’ या माजी क्रिकेटपटू मोहम्मद अजहरूद्दीन याच्या आयुष्यावर बेतलेल्या बायोपिकमध्ये अभिनेत्री प्राची देसाई हिचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या चित्रपटात प्राची अजहरूद्दीनची पहिली पत्नी नौरीन हिची भूमिका साकारत आहे. चित्रपटात नौरीनची भूमिका साकारण्याआधी प्राची प्रत्यक्ष नौरीनला भेटली होती. हा क्षण भावूक करणारा होता, असे प्राची सांगते. मी नौरीनला भेटली. या भेटीनंतर नौरीनबद्दलचे माझे विचार पूर्णत: बदलले. मी तिला भेटून प्रचंड भावूक झाले होते. मी क्षणात तिच्याशी जोडले गेले. कदाचित चित्रपटात मी तिची भूमिका साकारत असल्यामुळे असे झाले असेल. तिने माझ्याशी बºयाच गोष्टी शेअर केल्या. तिला आपल्या खासगी आयुष्यातील गोष्टी जगजाहिर करायच्या नाहीत. पण तरिही तिने मला बºयाच गोष्टी सांगितल्या. या सगळ्या गोष्टी मला प्रेरणा देऊन गेल्यात.मला तिच्याबद्दल प्रचंड आदर आहे. नौरीन एक रहस्य आहे. ती अजहरची पहिली प्रेयसी पत्नी होती. १६ वर्षांची असताना तिने अजहरशी लग्न केले. तिला पडद्यावर उभे करणे माझ्यासाठी प्रचंड आव्हानात्मक होते, असे प्राचीने सांगितले.