प्रभासची बहीण प्रगतीने केला खुलासा; अखेर केव्हा होणार ‘बाहुबली’चे लग्न?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 19:24 IST
दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ सीरीजने प्रभासला रातोरात सुपरस्टार केले. सध्या देशभरात प्रभासविषयी जेवढी चर्चा रंगविली जाते, तेवढी ...
प्रभासची बहीण प्रगतीने केला खुलासा; अखेर केव्हा होणार ‘बाहुबली’चे लग्न?
दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ सीरीजने प्रभासला रातोरात सुपरस्टार केले. सध्या देशभरात प्रभासविषयी जेवढी चर्चा रंगविली जाते, तेवढी चर्चा कदाचित इतर कुठल्याही स्टारबाबत नसावी. यामुळेच प्रभासविषयी कुठलीही बातमी इंटरनेटवर येताच त्यावर चर्चा रंगविली जाते. सध्या त्याच्या लग्नावरून चर्चा रंगत असून, त्याची ‘देवसेना’ कोण असेल? हे जाणून घेण्याची सगळ्यानाच उत्सुकता लागली आहे. आता याबाबतचा उलगडा त्याची बहीण प्रगती हिने केला असून, प्रभास नक्की लग्न केव्हा करणार? या कोड्याची उकल होण्याची शक्यता आहे. खरं तर प्रभासच्या लग्नावरून मीडियामध्ये दररोज कुठली ना कुठली बातमी येत आहे. एकदा अशी बातमी समोर आली होती की, प्रभास एका बिझनेसमॅनच्या नातीबरोबर लग्न करणार आहे. मात्र ही बातमी निव्वळ अफवा ठरली. त्यानंतर अशी बातमी समोर आली की, तो त्याच्या आॅनस्क्रीन पार्टनर अनुष्का शेट्टी हिच्याबरोबर लग्न करणार आहे. पुढे ही देखील बातमी अफवा ठरली. अशात त्याच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, प्रभास लग्न करणार तरी केव्हा? याच प्रश्नाचा उलगडा करण्यासाठी इंडिया डॉट. कॉम या साइटने प्रभासच्या बहीणीशी चर्चा केली. ज्यामधून हा उलगडा झाला की, ‘बाहुबली’ अर्थात प्रभास सध्या लग्न करण्याचा विचारच करीत नाही. सध्या त्याचे पुर्ण लक्ष करिअरवर आहे. प्रभासची बहीण प्रगतीने दिलेल्या माहितीनुसार, ‘आम्ही प्रभासच्या लग्नाविषयी खूपच उत्साहित आहोत. कारण जेव्हा त्याचे लग्न असेल तेव्हा आम्हाला सगळ्यानाच एन्जॉय करायला मिळणार आहे.’ मात्र तो क्षण केव्हा येणार याबाबत प्रगतीलाही माहिती नसल्याचे तिच्याशी चर्चा करताना लक्षात आले. प्रभासच्या पर्सनल लाइफला बाजूला सारून त्याच्या प्रोफेशनल लाइफविषयी सांगायचे झाल्यास सध्या तो त्याच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात तो बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्याबरोबर रोमान्स करताना बघावयास मिळणार आहे. हा चित्रपट एक जबरदस्त अॅक्शन थ्रिलर आहे. ‘बाहुबली-२’च्या वेळेस या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला होता. त्यास प्रेक्षकांना उदंड प्रतिसाद दिला. त्यामुळे या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.