Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रभासने ‘साहो’साठी ‘बाहुबली’पेक्षाही घेतले अधिक मानधन; वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 15:12 IST

‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली-२’च्या प्रचंड यशानंतर प्रभास असा अभिनेता बनला आहे, ज्याचे घराघरात चाहते आहेत. त्याशिवाय बरेचसे निर्माता त्याच्यासोबत चित्रपट ...

‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली-२’च्या प्रचंड यशानंतर प्रभास असा अभिनेता बनला आहे, ज्याचे घराघरात चाहते आहेत. त्याशिवाय बरेचसे निर्माता त्याच्यासोबत चित्रपट बनविण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे साहजिकच वाढत्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी प्रभासने त्याच्या मानधनातही वाढ केली आहे. ‘बाहुबली-२’साठी प्रभासने फक्त २० ते २५ कोटी रुपये मानधन घेतले आहे. परंतु त्याच्या आगामी ‘साहो’साठी त्याने यात वाढ केली असून, निर्मात्यांकडे ३० कोटी रुपयांची मागणी केली आहे. अर्थात प्रभासची ही मागणी लगेचच पूर्णही करण्यात आली आहे. खरं तर बॉलिवूडमध्येही मोजकेच अभिनेते एवढ्या मोठ्या प्रमाणात मानधन घेतात. अशात प्रभासच्या मानधनाचा आकडा बॉलिवूड सुपरस्टार्ससाठी नक्कीच आश्चर्यचकित करणारा ठरणार आहे. मिड डे रिपोर्टनुसार प्रभासने ‘साहो’साठी ३० कोटी रुपये घेतले आहेत. त्याचा हा चित्रपट हिंदी, तामीळ आणि तेलगूमध्ये रिलीज केला जाणार आहे. तर चित्रपटाची शूटिंग मुंबई, हैदराबाद, अबूधाबी आणि बुचारेस्ट येथे केली जाणार आहे. गेल्या काही काळापासून चित्रपटात प्रभासची हिरोईन कोण असेल? यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अगोदर अनुष्का शेट्टी प्रभाससोबत पुन्हा एकदा झळकणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर कॅटरिना कैफ, सोनम कपूर यांचीही नावे पुढे आली. परंतु आता अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. श्रद्धा आणि प्रभास पहिल्यांदाच ‘साहो’मधून रोमान्स करणार आहेत. या वृत्तास स्वत: यूवी क्रिएशनचे निर्माते वामसी आणि प्रमोद यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी म्हटले की, श्रद्धा या भूमिकेसाठी परफेक्ट च्वाइस आहे. तिच्या भूमिकेमुळे सर्व खूश आहेत. पुढे बोलताना वामसी आणि प्रमोद यांनी सांगितले की, ‘साहो’ प्रभासचा पहिला असा चित्रपट आहे, जो हिंदीमध्ये शूट केला जाणार आहे. त्यामुळेच आमच्यासाठी हा चित्रपट खूप स्पेशल आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असून, त्यामध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स बघावयास मिळणार आहे. ‘साहो’चे म्युझिक शंकर, एहसान आणि लॉय देणार आहेत. तर गाण्यांचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांचे असतील. चित्रपटात नील नितीन मुकेश यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. दरम्यान, ‘साहो’चे टीजर बाहुबली-२ बरोबरच रिलीज करण्यात आले आहे. सुजीथ यांच्या दिग्दर्शन असलेला हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. निर्मात्यांनी अ‍ॅक्शन सीन्ससाठी एक हायप्रोफाइल अ‍ॅक्शन कोरिओग्राफर हायर केला आहे. त्याचबरोबर चित्रपटात प्रचंड प्रमाणात सीजीआ आणि व्हीएफएक्स इफेक्ट्स बघावयास मिळणार आहेत. चित्रपटात प्रभास दोन अंदाजात बघावयास मिळणार आहे.