Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रभासचा 'फौजी' अन् रणबीरच्या 'रामायण'ची होणार टक्कर? महत्वाचं अपडेट समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:37 IST

गेले काही सिनेमे फ्लॉप देऊनही प्रभासकडे आणखी चित्रपटांची रांग

अभिनेता प्रभास नुकताच 'द राजा साहब' सिनेमात दिसला. मात्र हा सिनेमा प्रेक्षकांच्या फारसा पसंतीस उतरला नाही. सिनेमाचं बजेट जास्त असल्याने मोठं नुकसानही सोसावं लागलं. मात्र प्रभासच्या चाहत्यांना काळजी करण्याचं कारण नाही कारण त्याच्याकडे  आणखी बरेच सिनेमे आहेत. सध्या तो हनु राघवपुडी दिग्दर्शित 'फौजी' सिनेमाच्या तयारित आहे. हा सिनेमा याचवर्षी ऑगस्टमध्ये रिलीज करायचा मेकर्सचा विचार आहे. याचा अर्थ प्रभास आणि रणबीर कपूरची बॉक्सऑफिसवर टक्कर होईल असा अंदाज आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

प्रभास आगामी 'सालार २',' कल्कि २',' स्पिरीट','फौजी' अशा सिनेमांमध्ये दिसणार आहे. या मल्टीपल प्रोजेक्ट्सवर प्रभास काम करत आहे. यातील फौजी लवकर रिलीज केला जाणार आहे कारण याला हनु राघवपुडी दिग्दर्शित करत आहेत. त्यांनी आधीच 'सीतारामम' सिनेमातून सर्वांना मंत्रमुग्ध केलं होतं. सध्या 'फौजी'चं शूट जोरदार सुरु आहे. 

फौजी एक पीरियड फिल्म आहे. स्वातंत्र्याच्या आधीच्या बॅकग्राऊंडवर सिनेमा आधारित आहे.  युद्ध आणि इमोशनल अँगलही सिनेमात पाहायला मिळणार आहे. सिनेमात प्रभास डबल रोलमध्ये दिसणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान आता सिनेमा दिवाळीत रिलीज होणार असल्याची चर्चा आहे. याचवेळी रणबीर कपूरचा 'रामायण' येणार असल्याने प्रभास आणि रणबीर कपूर यांच्यात क्लॅश होणार आहे.  

सिनेमाची ओटीटी डीलही अजून व्हायची आहे. प्रभासचा स्पिरिट २०२७ मध्ये येणार आहे. फौजी आणि स्पिरीटमध्ये अंतर असणं आवश्यक आहे. २०२७ मध्ये उन्हाळ्याच्या आधी सिनेमा रिलीज करणं अशक्य आहे. सिनेमाचं पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरु आहे. जुलै पर्यंत हे काम संपणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Prabhas' 'Fauji' vs. Ranbir's 'Ramayan': Box Office Clash?

Web Summary : Prabhas' 'Fauji,' a period film, may clash with Ranbir Kapoor's 'Ramayan' this Diwali. 'Fauji' is set before independence, featuring war and emotion, with Prabhas potentially in a double role. Release date and OTT deal are pending.
टॅग्स :रणबीर कपूरप्रभासबॉलिवूड