Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाढलेलं वजन अन् चेहऱ्यावर काळे डाग ! प्रभासचे ‘नो मेकअप’मधील फोटो पाहून चाहते शॉक्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 13:33 IST

‘आदिपुरूष’ या सिनेमाचे उर्वरित शूटींग पूर्ण करण्यासाठी प्रभास मुंबईत आला. काल रात्री मुंबईच्या रस्त्यावरचे त्याचे फोटो समोर आलेत आणि क्षणात व्हायरल झालेत. पण हे काय?

ठळक मुद्देप्रभासच्या ‘आदिपुरूष’ या सिनेमाबद्दल सांगायचे तर या सिनेमात प्रभाससोबत क्रिती सॅनन, सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका आहेत.

साऊथचा सुपरस्टार प्रभास (Prabhas )सध्या एक एक प्रोजेक्ट हातावेगळा करताना दिसतोय.  ‘आदिपुरूष’ या सिनेमाचे उर्वरित शूटींग पूर्ण करण्यासाठी प्रभास मुंबईत आला. काल रात्री मुंबईच्या रस्त्यावरचे त्याचे फोटो समोर आलेत आणि क्षणात व्हायरल झालेत. पण हे काय? त्याचे हे फोटो पाहून चाहते शॉक्ड झालेत. अनेकांनी तर हे फोटो पाहिल्यानंतर प्रभासला ट्रोल करणे सुरू केले.फोटोमध्ये प्रभास गाडीच्या मागच्या सीटवर बसलेला दिसतोय. डोक्यावर कॅप आणि डोळ्यांवर गॉगल आहे. वजन वाढलेलं दिसतेय. विनामेकअप त्याला ओळखणेही कठीण होतेय.  

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने हे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.  या फोटोंवर चाहत्यांनी लिहिलेल्या कमेंट वाचून तुम्हीही हैराण व्हाल.विना मेकअप हा किती भयानक दिसतोय, असे एका युजरने लिहिले. कोणी प्रभासला ‘काला जामुन’ म्हटले तर काहींनी ‘छोटा भीम’ म्हणत ट्रोल केले.

‘इतका लठ्ठ राम, आदिपुरूष नक्कीच फ्लॉप होणार,’ अशी कमेंट एका युजरने केली. एका युजरने तर चक्क प्रभासला रिटायर्ड होण्याचा सल्ला दिला. ‘स्वत:पेक्षा अर्ध्या वयाच्या हिरोईनमागे फिरण्यापेक्षा याने आता रिटायर्ड व्हायला हवं. आता हा म्हातारा दिसू लागला आहे,’ असे या युजरने लिहिले.याआधीही प्रभास असाच ट्रोल झाला होता. यापूर्वी एका गाण्याच्या रिहर्सलसाठी प्रभास मुंबईत आला होता. यावेळी अभिनेत्री क्रिती सॅननसोबतचे त्याचे फोटो व्हायरल झाले होते. या फोटोतील प्रभासला पाहून चाहत्यांनी अशाच प्रतिक्रिया दिल्या होत्या.

प्रभासच्या ‘आदिपुरूष’ या सिनेमाबद्दल सांगायचे तर या सिनेमात प्रभाससोबत क्रिती सॅनन, सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘तान्हाजी’ या सुपरडुपर हिट चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. हा सिनेमा पौराणिक कथा रामायणवर आधारित आहे, ज्यामध्ये प्रभास श्री रामची भूमिका साकारणार आहेत आणि सैफ अली खान रावणच्या भूमिकेत दिसणार आहेत. या मेगा बजेट सिनेमाची निर्मिती टी-सीरीज करणार आहे.   तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत हा सिनेमा रिलीज होणार आहे.

टॅग्स :प्रभास