Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रभास म्हणतो, ‘पुरे झाला आराम; आता करूया काम’, ‘साहो’च्या शूटिंगला उद्यापासूनच सुरुवात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2017 22:41 IST

सध्या ‘बाहुबली’ अर्थात प्रभासविषयी कुठलीही माहिती समोर आली तरी ती माध्यमांमध्ये एक्सक्लुझिव्ह बातमी ठरत आहे. आता अशीच काहीशी बातमी ...

सध्या ‘बाहुबली’ अर्थात प्रभासविषयी कुठलीही माहिती समोर आली तरी ती माध्यमांमध्ये एक्सक्लुझिव्ह बातमी ठरत आहे. आता अशीच काहीशी बातमी आम्ही तुम्हाला सांगत आहोत. प्रभास नुकताच अमेरिकेतून सुट्या एन्जॉय करून भारतात परतला असून, लवकरच तो त्याच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. खरं तर उद्यापासूनच प्रभास ‘साहो’च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. काही वेळापूर्वीच प्रभासचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. फोटोमधील प्रभासचा लूक बघून त्याला ओळखणे मुश्कील झाले होते. कारण बºयाचशा काळानंतर प्रभासचा एक फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. त्याचा हा फोटो ‘साहो’ या चित्रपटासाठी त्याचा विशेष लूक असावा असा कयास लावला जात आहे. दरम्यान सुरुवातीला ‘साहो’ची शूटिंग जुलै महिन्यात सुरू करण्याचा प्रभासचा मानस होता. परंतु त्याने उद्यापासून शूटिंगला सुरुवात करण्याचे स्पष्ट केल्याने, निर्मात्यांसह सगळ्यांचीच तारांबळ उडाली आहे. शूटिंगसाठी प्रभास हैदराबादला पोहोचला असून, आता आराम नाही तर कामाला सुरुवात करायची असा त्याने निर्धार केला आहे. बराचसा काळ अमेरिकेत सुट्या एन्जॉय केल्यानंतर प्रभासला आराम करण्यात आता अजिबात रस उरला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच त्याने शूटिंगला लवकरच सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘बाहुबली-२’मुळे रातोरात स्टारडम मिळालेल्या प्रभासने साउथबरोबरच बॉलिवूडमध्ये स्वत:चा दबदबा निर्माण केला आहे. प्रभासने ‘बाहुबली-२’ या चित्रपटासाठी आयुष्याचे तब्बल पाच वर्षं पूर्णत: समर्पित केले होते. यादरम्यान त्याने कुठल्याही चित्रपटात किंवा जाहिरातीमध्ये काम केले नाही. हे करीत असताना त्याला अनेक अडचणींचा सामनाही करावा लागला. परंतु त्याने दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांना दिलेला शब्द पाळला. त्याने पूर्ण लक्ष ‘बाहुबली’ या प्रोजेक्टवरच केंद्रित केले होते. त्याचीच प्रचिती म्हणून प्रभास आज भारतातील सर्वाधिक पॉप्युलर सुपरस्टार बनला आहे. दरम्यान, तो लवकरच त्याच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.