Join us

ऐकावं ते नवलच! बाहुबली फेम प्रभासने नाकारली आहेत 5 हजार मुलींच्या लग्नाची स्थळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 17:43 IST

पण प्रभासने यावर मौन पाळणचं पसंत केले.

तमिळ आणि तेलूगु सिनेमाचा स्टार प्रभासची लोकप्रियता आधीपासूनच होती. मात्र बाहुबली- द बिगिनिंग आणि बाहुबली- द कन्कल्युजन या सिनेमातील भूमिकेमुळे प्रभास रातोरात सुपरस्टार बनला. देशासह जगभरातील प्रभासची लोकप्रियता सर्वोच्च शिखरावर पोहोचली आहे. 

बाहुबलीच्या यशानंतर मुली प्रभासच्या प्रेमात वेड्या झाल्या. जवळपास 5 हजार मुलींच्या लग्नाचे प्रपोजल आले. पण प्रभासने सर्वांना नकार दिला. त्यानंतर प्रभास अमेरिकेतील एक दिग्गज उद्योगपतीच्या मुलीसह लग्न बंधनात अडकणार अशा अफवा उडाल्या होत्या. पण त्यावेळी देखील प्रभासने मौन पाळणचं पसंत केले. 

यासगळ्यात प्रभासचे नाव नेहमीच जोडले गेले ते अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबत. ‘बाहुबली-२’ प्रभास आणि अनुष्काची केमिस्ट्री प्रेक्षकांनाही आवडली. प्रभास आणि अनुष्का दोघांनीही त्यांच्या अफेअरच्या बातम्या कायम नाकारल्या.  जवळपास दोघांची 10 वर्षांपासून मैत्री आहे.   २००९ मध्ये आलेल्या ‘बिल्ला’ या चित्रपटात अनुष्का शेट्टी आणि प्रभासने एकत्र काम केले होते. 

आपल्या 14 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत प्रभासने केवळ 19-20 चित्रपट केले आहेत. बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खानप्रमाणेच प्रभासही वर्षाला एकच चित्रपट करतो. प्रभास राजकुमार हिरानींचा मोठा चाहता आहे. त्याने ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘3 इडियट्स’ 20 हे चित्रपट वेळा पाहिले आहेत.

टॅग्स :प्रभास