Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रभास नाही, आता महेशबाबू! ‘बाहुबली’ फेम एस. एस. राजमौली यांना सापडला नवा हिरो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 15:13 IST

‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘बाहुबली’नंतर राजमौली एक नवा कोरा सिनेमा घेऊन ...

‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘बाहुबली’नंतर राजमौली एक नवा कोरा सिनेमा घेऊन येत आहेत. आता या चित्रपटात लीड रोलमध्ये कोण असणार, असा एक विचार तुमच्या मनात नक्कीच आला असणार. आला असेल तर मग, पुढे वाचा...खरे तर राजमौलीच्या या चित्रपटात अभिनेता महेशबाबू दिसणार, अशी चर्चा होती. पण आता ही चर्चा कन्फर्म झालीय. होय, राजमौलींच्या पुढील चित्रपटात महेशबाबू हाच मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यंदा नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये या चित्रपटाचे शूटींग सुरु होणार आहे. राजमौली यांनी प्रभास, राणा डुग्गूबती, ज्युनिअर एनटीआर, नानी अशा तेलगू सुपरस्टार्ससोबत काम केले आहे. महेशबाबूसोबत मात्र ते पहिल्यांदा काम करणार आहेत. तूर्तास राजमौलींच्या या नव्या चित्रपटाचे नाव, उर्वरित स्टारकास्ट याबाबत फार माहिती मिळू शकली नाही. पण ‘बाहुबली’चे यश बघता, राजमौलींच्या नव्या सिनेमाबद्दल लोकांच्या मनात प्रचंड आतुरता आहे. ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली2’नंतर राजमौली यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा  वाढल्या आहेत. त्यातही त्यांना महेशबाबूची साथ मिळणार असेल तर या अपेक्षा प्रचंड वाढणार यात शंका नाही.ALSO READ: Spyder trailer: महेशबाबूचे चाहते आहात? मग ‘स्पाईडर’चा हा धमाका बघाच!!महेशबाबूबद्दल सांगायचे तर तो सध्या ‘स्पाईडर’ या चित्रपटात बिझी आहे. त्याचा हा अ‍ॅक्शन थ्रीलर चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.  तामिळ, तेलगू  अशा दोन भाषांमध्ये (हिंदीतही हा चित्रपट डब होणार, अशी चर्चा आहे) रिलीज होणारा हा सिनेमा आत्तापर्यंतच्या सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडणार, असा दावा केला जात आहे. अलीकडे या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता.   आर मुरूगदास दिग्दर्शित या थ्रीलर चित्रपटात महेशबाबू एका गुप्तचर अधिका-याच्या भूमिकेत आहे. ट्रेलर बघता महेशबाबूच्या या चित्रपटात अ‍ॅक्शन, थ्रील, रोमान्स, लव्ह अशा सगळ्यांचे कॉम्बिनेशन पाहायला मिळणार असल्याचे दिसतेय.