Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रभासच्या एका जबरा फॅनने वेधले सा-यांचे लक्ष, कारण जाणून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 16:45 IST

प्रभासच्या चाहत्याने हैदराबादमध्ये नवीन रेस्टॉरंट सुरू केले. सध्या हे रेस्टाँरंट प्रभासमुळे चर्चेत आहे. कारण हे रेस्टॉंरंट प्रभासच्या सिनेमांच्या पोस्टरने सजवण्यात आले आहे.

तमिळ आणि तेलूगु सिनेमाचा स्टार प्रभासची लोकप्रियता आधीपासूनच होती. मात्र 'बाहुबली- द बिगिनिंग' आणि 'बाहुबली- द कन्कल्युजन' या सिनेमातील भूमिकेमुळे प्रभास रातोरात सुपरस्टार बनला. देशासह जगभरातील प्रभासची लोकप्रियता सर्वोच्च शिखरावर पोहचली आहे. तो जे काही करतो त्याची चर्चा होते. त्यामुळेच त्याचे लाखो फॅन्स त्याच्यावर जीव ओवाळून टाकतात. 

अनेकदा आपल्या लाडक्या कलाकारावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी फॅन्स आयडियाची कल्पना लढवत इतरांचेही लक्ष वेधून घेत असतात.दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचे भारतातच नाही तर जगभरात त्याचे फॅन्स पसरलेत. त्याच्या प्रत्येक फॅन्सची काही ना काही खास बात असते. प्रभासच्या अशाच एका जबरा फॅनने सध्या सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

प्रभासच्या चाहत्याने हैदराबादमध्ये नवीन रेस्टॉरंट सुरू केले. सध्या हे रेस्टाँरंट प्रभासमुळे चर्चेत आहे. कारण हे रेस्टॉंरंट प्रभासच्या सिनेमांच्या पोस्टरने सजवण्यात आले आहे. 'पक्का लोकल' असे या रेस्टाँरंटचे नाव आहे. या रेस्टाँरंटचा मालक हा प्रभासचा मोठा चाहता असल्याचे यावरुन स्पष्ट होते. सध्या सोशल मीडियावर या रेस्टॉरंटचे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत. जेव्हा प्रभासची नजर या रेस्टॉरंटच्या फोटोवर पडेल तेव्हा या जबरा फॅनचं मन त्याने नक्कीच जिंकलेलं असेल हे मात्र नक्की.

प्रभास गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी 'आदिपुरूष' सिनेमामुळे चर्चेत आहे. अशात त्याचं एका खास गोष्टीमुळेत्याचे सोशल मीडियावर कौतुक केलं जातंय. अभिनेता प्रभासने त्याच्या जिम ट्रेनरला चक्क ८९ लाख रूपयांची रेंज रोव्हर वेलर कार गिफ्ट केलीय. जिम ट्रेनर लक्ष्मण रेड्डी गेल्या अनेक वर्षांपासून प्रभासच्या फिटनेसवर काम करत आहे आणि प्रभास त्याला त्याच्या लाइफमधील स्पेशल पर्सन मानतो.

 

प्रभासचा जिम ट्रेनरर लक्ष्मण रेड्डी हा २०१० मध्ये मिस्टर वर्ल्ड राहिलेला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये प्रभास लक्ष्मणच्या फॅमिलीसोबत कारसह फोटो सेशन करतानाही दिसत आहे. फॅन्सचं मत आहे की, प्रभासचं ट्रान्सफॉर्मेशन बघून हे सहजपणे म्हटलं जाऊ शकतं की, त्याचा जिम ट्रेनर हे गिफ्ट डिझर्व्ह करतो.

टॅग्स :प्रभास