प्रभास आणि अनुष्काचा डिसेंबरमध्ये साखरपुडा ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 10:39 IST
सध्या प्रभास आणि अनुष्काच्या कथित प्रेम कहानी जास्तच रंगात आली आहे. बाहुबलीच्या यशानंतर यातील मुख्य भूमिका असलेली ही जोडी ...
प्रभास आणि अनुष्काचा डिसेंबरमध्ये साखरपुडा ?
सध्या प्रभास आणि अनुष्काच्या कथित प्रेम कहानी जास्तच रंगात आली आहे. बाहुबलीच्या यशानंतर यातील मुख्य भूमिका असलेली ही जोडी लवकरच साखरपुडाच्या तयारीला लागल्याची बातमी आली आहे. सूत्रानुसार ते डिसेंबरमध्ये कदाचित साखरपुडा करतील. अनुष्का आणि प्रभासच्या अफेर बद्दल आधीपण बातम्या मिळत होत्या पण दोघांनीही या बातमीला खोटी ठरवत आम्ही एकमेकांचे फक्त चांगले मित्र आहोत असे सांगितले. अनुष्का आणि प्रभासच्या ऑन स्क्रिन जोडीला प्रेक्षकांनी पसंत केले आहे. बाहुबलीच्या आधी त्यांची दोघांची पहिला चित्रपट 'बिल्ला' होता. त्यानंतर हे दोघे एकत्र ' मिर्ची, 'बाहुबली' आणि 'बाहुबली २'मध्ये एकत्र दिसले. तेलगु चित्रपटामध्ये या जोडीला चांगलाच डिमांड आहे. बाहुबलीमुळे या दोघांचे कौतुक फक्त साऊथमध्ये नव्हे तर जगभरात होत झाले. प्रभास आपल्या वैयक्तिक आयुष्याला मीडियासमोर कधीच आणत नाही. त्याचे म्हणणे आहे की " माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायला आवडत नाही. भरपूरजण मला माझ्या अफेअर आणि लग्नाबद्दल विचारत असतात, मला असे वाटते की माझे आयुष्य हे माझे असावे आणि जेव्हा मी लग्न करेन तेव्हा तुम्हाला नक्कीच कळवेन''. बाहुबली २ नंतर प्रभास सध्या "साहो" च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचे शूटिंग हैद्राबाद मध्ये सुरू आहे. यात त्याच्यासोबत श्रद्धा कपूरसोबत दिसणार आहे. श्रद्धा आणि प्रभासची जोडी पहिल्यांदाच स्क्रिनवर एकत्र दिसणार आहे. हा एक अॅक्शन चित्रपट असणार आहे. हा चित्रपट हिंदी, तामीळ आणि तेलगू भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे. साहो बिग बजेट चित्रपट असून त्याचा बजेट १५० कोटी रुपये इतके आहे. श्रद्धाने यात काम करण्यासाठी १२ कोटींचे मानधन मागितले होते मात्र मेकर्सने तिला ९ कोटी रुपयांवर तडजोड करायला लावली. यात तिचा डबल रोल असल्याचे ही कळते आहे.ALSO READ : प्रभास म्हणतो, आता तर मलाही माझ्यात व अनुष्कात काहीतरी आहे असे वाटू लागलेयं!तर दुसरीकडे अनुष्का शेट्टी सुद्धा तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दोघांच्या साखरपुड्याची बातमीत कितपत तथ्य आहे हे येत्या दोन महिन्यांत कळेल.