Join us
Daily Top 2Weekly Top 5

ममताला अटक होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 13:45 IST

नव्वदीच्या दशकातील अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या विरोधात ड्रग्सची तस्करी करण्यासंबंधित सबळ पुरावे मिळाले असून तिला लवकरात लवकर अटक होण्याची शक्यता ...

नव्वदीच्या दशकातील अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या विरोधात ड्रग्सची तस्करी करण्यासंबंधित सबळ पुरावे मिळाले असून तिला लवकरात लवकर अटक होण्याची शक्यता आहे. विकी आणि ममता भारतात ड्रग्सची तस्करी करत असल्याचे सबळ पुरावे पोलिसांना मिळाले असून ममताच्या अकाऊंटमध्ये पैसेही ट्रान्सफर केले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रग्स तस्करी संबंधित होत असणाऱ्या चर्चांनाही विकीसोबत ममताही उपस्थित राहात होती. ममताविरोधात दोन साक्षीदारांनी साक्षही दिलेली आहे. ममता आणि विकी हे दोघे सध्या केनियात असून त्यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटिस बजावण्यात येणार आहे असे ठाणे आयुक्त परमवीर सिंह यांनी सांगितले. सध्या पोलिस दोघांच्याही बँक अकाऊंट आणि मालमत्तेची चौकशी करत आहेत. तसेच ममताच्या नावावर असणाऱया ११ लाखांच्या शेअर्सचीही चौकशी केली जाणार आहे. ममताचे पती विकी गोस्वामीचे नाव नेहमीच ड्रग्सच्या तस्करी संदर्भात जोडले गेलेले आहे. विकीला आणि ममताला दोन वर्षांपूर्वी ड्रग्स तस्करी प्रकरणात केनियात अटकही करण्यात आली होती.