Join us  

राज कुंद्रा, शर्लिन चोप्रा, पूनम पांडेने बनवली पॉर्न फिल्म, चार्जशीट दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 1:49 PM

Pornography Case: शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा पुन्हा एकदा पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकला आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी राज कुंद्रा, शर्लिन चोप्रा, पूनम पांडे आणि इतरांविरुद्ध अश्लील मजकूर तयार करून OTT प्लॅटफॉर्मवर दाखवल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty)चा नवरा राज कुंद्रा (Raj Kundra) काही दिवसांपूर्वी पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकला होता. अश्लील व्हिडिओ बनवण्यात त्याचा हात असल्याचे अनेक वृत्त समोर आले होते. दरम्यान, काही काळापूर्वी हे प्रकरण निवळले होते. मात्र आता पुन्हा एकदा या प्रकरणाने डोके वर काढले आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी व्यावसायिक आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा आणि इतरांविरुद्ध अश्लील मजकूर तयार करून ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवल्याबद्दल चार्जशीट दाखल केली आहे. यामध्ये शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra ) आणि पूनम पांडे(Poonam Pandey)चेही नाव आहे.

राज कुंद्राला मागील आठवड्यात मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले होते. मॉडेल शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे, फिल्ममेकर मीता झुनझुनवाला आणि कॅमेरामन राजू दुबे यांच्या विरोधात ४५० पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सायबर पोलिसांनी गेल्या आठवड्यात कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, त्यांच्यावर फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये अश्लील व्हिडिओ शूट केल्याचा आरोप आहे. आरोप पत्रात प्राइम ओटीटीचे सुवाजित चौधरी आणि राज कुंद्राचे कर्मचारी उमेश कामथ यांची लंडनस्थित कंपनी हॉटशॉटचे व्यवस्थापक म्हणून नावे आहेत, जी कुंद्राचे मेहुणे प्रदीप बक्षी यांच्या केनिन या कंपनीच्या मालकीची आहे, जी यूकेमध्ये नोंदणीकृत आहे.

राज कुंद्राला झाली होती अटकमागील वर्षी जुलै महिन्यात राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाली होती. दोन महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. जामिनाला वर्ष पूर्ण झाल्यानंतर राजने केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) पत्र लिहून या प्रकरणात न्यायाची मागणी केली होती. मी निर्दोष असून मला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा दावा राज कुंद्राने केला होता. राज कुंद्राच्या अटकेनंतर त्याच्या ऑफिसमध्ये पोलिसांनी छापेमारी केली होती. त्याच्या ऑफिसमधून जप्त केलेल्या लॅपटॉपमध्ये ६८ पॉर्न व्हिडीओ आढळले होते.

टॅग्स :राज कुंद्राशर्लिन चोप्रापूनम पांडे