Join us

'रात्री माझा व्हिडीओ बघतात आणि सकाळी...' पूनम पांडे ट्रोलर्सवर संतापली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 16:23 IST

कंगना राणौवतच्या  ‘लॉक अप’ या शोमध्ये दिसत आहे. याच शोच्या एका एपिसोडमध्ये पूनम पांडेने तिला ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे.

अभिनेत्री पूनम पांडे सोशल मीडियावरील बोल्ड फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. तिचे हे फोटो आमि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होतात. ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे बोल्ड व्हिडिओ शेअर करत असते. दरम्यान पूनम पांडे सध्या कंगना राणौवतच्या  ‘लॉक अप’ या शोमध्ये दिसत आहे. याच शोच्या एका एपिसोडमध्ये पूनम पांडेने तिला ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे.

पूनमने तिला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. स्पर्धकांशी संवाद साधताना पूनम पांडे तिच्या संघर्षबाबत बोलताना म्हणाली, ''मी माझे शरीर दाखवते, कपडे काढते, फक्त तुम्ही मला निर्लज्ज म्हणू शकत नाही. जे दुसऱ्यांविषयी वाईट बोलतात ते लोक स्वत: वाईट असतात.'' 

यादरम्यान तहसीन पूनावाला म्हणाला, जे पूनम पांडेचे व्हिडिओ डाउनलोड करतात आणि नंतर पूनमबद्दल वाईट बोलतात ते चुकीचे आहेत. याला सहमती दर्शवत पूनम म्हणाली, 60 मिलियन फॉलोवर्स असे एका महिन्यात येत नाहीत. हे छुपे फॉलोवर्स कोण आहेत?  हे लोक रात्री माझे व्हिडिओ पाहतात आणि सकाळी उठल्यावर मला ट्रोल करतात आणि माझ्याविरुद्ध कमेंट करतात. मला जाणून घ्यायचे आहे की कोण निर्लज्ज आहे, मी कि ते. 

पुढे पूनम म्हणाली, त्या लोकांना नेहमी माझी काळजी असते. मी लग्न करणार की नाही? मी कसे कपडे घालू? मी मुलाला जन्म देणार की नाही? मी त्यांना सांगू इच्छितो की ही माझी जबाबदारी आहे. माझं आयुष्य मी माझ्या पद्धतीने जगेन. ते कसं जगायचं हे कुणी मला सांगण्याची गरज नाही. 

टॅग्स :पूनम पांडे