Join us

पूजा ‘त्या’ वेळी नव्हती नर्व्हस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 16:28 IST

 पूजा हेगडे आणि हृतिक रोशन हे सध्या ‘मोहेंजोदडो’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हृतिकने एका मुलाखती सांगितले होते की, पूजाच्या अभिनयात ...

 पूजा हेगडे आणि हृतिक रोशन हे सध्या ‘मोहेंजोदडो’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हृतिकने एका मुलाखती सांगितले होते की, पूजाच्या अभिनयात एक वेगळीच शुद्धता, सात्विक, साधेपणाचे भाव आहेत जे इतर अभिनेत्रींमध्ये क मी पहावयास मिळतात.’ जेव्हा हृतिकचे बोल पूजाने ऐकले तेव्हा तिला विश्वासच बसला नाही की, एवढा मोठा कलाकार आपल्याविषयी असे बोलतोय.जेव्हा तिला कळाले की, हृतिकबरोबर आपल्याला घेण्यात आलेले आहे. तेव्हा तिला आश्चर्य वाटले की, हृतिकसारख्या कलाकारासोबत काम करण्याची आपल्याला संधी मिळावी. पूजा-हृतिक यांच्यातील किसिंग सीनविषयी विचारले असता ती म्हणाली,‘ आमच्या दोघांमध्ये एक फ्रेंडली रिलेशन तयार झाले होते.जेणेकरून मला किसींग सीनवेळी मला अजिबात नर्व्हसनेस वाटत नव्हता. आम्ही दोन वर्षांपासून एकमेकांसोबत या चित्रपटासाठी शूटींग करतो आहोत. त्यामुळे एकमेकांसोबत आम्ही जास्त कम्फर्टेबल झालो आहोत. ’