Join us
Daily Top 2Weekly Top 5

चाहता असावा तर असा...! ‘तिच्या’साठी पठ्ठा पाच दिवस रस्त्यावर झोपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 13:30 IST

आम्हालाही अशीच भेटशील का?

ठळक मुद्दे पूजा हेगडेने आशुतोष गोवारिकरच्या  ‘मोहजोंदारो’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

बॉलिवूड स्टार्सचे फॅन्स आणि त्यांच्या अजब-गजब कथा आपण रोज ऐकतोय. आपल्या आवडत्या स्टारला भेटण्यासाठी, त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते कुठल्या दिव्यातून जातील याचा नेम नाही. आता पूजा हेगडेच्या या चाहत्याचेच बघा ना. हा चाहता केवळ पूजाला भेटण्यासाठी मुंबईत आला आणि तिच्या प्रतीक्षेत पाच दिवस चक्क रस्त्यावर झोपला.होय, खरे वाटणार नाही पण हे खरे आहे. भास्कर राव हे या चाहत्याचे नाव. पूजाला भेटायचेच या निर्धाराने भास्कर मुंबईत आला खरा. पण त्यावेळी पूजा मुंबईबाहेर होती. तरीही भास्करचा निर्धार कायम होता. त्याने काय करावे तर पूजाची वाट पाहत, कुडकुडत्या थंडीत रस्त्यावर झोपला. पाच रात्री त्याने अशाच थंडीत कुडकुडत रस्त्यावर काढल्या.  

पाच दिवसानंतर पूजा मुंबईत आली आणि तिला भास्करबद्दल कळले. हा चाहता आपल्यासाठी रस्त्यावर झोपल्याचे कळताच, ती कमालीची भावूक झाली आणि त्याला भेटायला पोहोचली. भास्करला भेटतानाचा व्हिडीओ पूजाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

भास्कर राव मुंबईत येण्यासाठी आणि माझी पाच दिवस वाट पाहण्यासाठी आभार.... पण मला भेटण्यासाठी तुला इतका त्रास सहन करावा लागला, याचे  मला दु:खही आहे. माझ्यासाठी चाहत्यांनी रस्त्यावर झोपावे, हे मला कधीच आवडणार नाही. तुम्ही सर्व माझी ताकद आहोत, लव्ह यू आॅल..., असे पूजाने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले आहे. या व्हिडीओत भास्करने पूजासाठी आणलेला चॉकलेटचा डबाही दिसतोय.

पूजाचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. विशेष म्हणजे, आम्हालाही अशीच भेटशील का? असा सवाल अनेकांनी हा व्हिडीओ पाहून केला आहे. पूजा हेगडेने आशुतोष गोवारिकरच्या  ‘मोहजोंदारो’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यात ती ऋतिक रोशनच्या अपोझिट दिसली होती. हा सिनेमा बॉक्स आॅफिसवर फ्लॉप झाला. पण तरीही तिची क्रेज कायम आहे. 

टॅग्स :पूजा हेगडे