दाक्षिणात्य आणि बॉलिवूड सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा हेगडे सध्या तिच्या आगामी 'है जवानी तो इश्क होना है' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यातच तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही एक मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पूजाच्या अफेअरच्या चर्चा रंगत होत्या. मात्र, आता पूजा हेगडे ही नेमकं कुणाला डेट करत आहे, याबाबत माहिती समोर आली आहे.
रोहन मेहरा हा ७०-८० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते दिवंगत विनोद मेहरा यांचा मुलगा आहे. रोहनने २०१८ मध्ये सैफ अली खानच्या 'बाजार' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अभिनयाव्यतिरिक्त त्याने 'बाजीराव मस्तानी' सारख्या मोठ्या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम पाहिले आहे. पूजा आणि रोहन गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.
'फिल्मफेअर'नुसार, पूजा आणि रोहन हे गेल्या वर्षभरात अनेक हाय-प्रोफाईल पार्ट्या आणि कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले. पूजा नेहमीच तिचे वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवणे पसंत करते, त्यामुळे तिने अधिकृतपणे अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. यापूर्वी तिचे नाव सलमान खानशीही जोडले गेले होते, मात्र त्या केवळ अफवा असल्याचे नंतर स्पष्ट झाले.
पूजाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकर वरुण धवन आणि मृणाल ठाकूर यांच्यासोबत 'है जवानी तो इश्क होना है' या चित्रपटात दिसणार आहे. डेव्हिड धवन दिग्दर्शित हा चित्रपट २२ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. याव्यतिरिक्त तिच्याकडे 'कांचना ४' आणि 'जना नायकान' सारखे मोठे दाक्षिणात्य चित्रपट आहेत.
Web Summary : Pooja Hegde is rumored to be dating Rohan Mehra, son of late actor Vinod Mehra. Rohan debuted in Bollywood with 'Baazaar' and has worked as an assistant director. They've been spotted together at events, though Pooja keeps her personal life private. She will be seen in 'Hai Jawani To Ishq Hona Hai'.
Web Summary : खबर है कि पूजा हेगड़े दिवंगत अभिनेता विनोद मेहरा के बेटे रोहन मेहरा को डेट कर रही हैं। रोहन ने 'बाजार' से बॉलीवुड में डेब्यू किया और सहायक निर्देशक के रूप में काम किया है। उन्हें कई कार्यक्रमों में एक साथ देखा गया है, हालाँकि पूजा अपने निजी जीवन को निजी रखती हैं। वह 'है जवानी तो इश्क होना है' में नजर आएंगी।