Join us
Daily Top 2Weekly Top 5

कास्टिंग काउचबद्दल पूजा चोपडाचा खुलासा; ‘मी दारू पित नाही, सिगारेट ओढत नाही...मग ?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2018 21:01 IST

- सतीश डोंगरेबॉलिवूडमध्ये कास्टिंग काउच हा ज्वलंत विषय बनत असतानाच अभिनेत्री पूजा चोपडा हिने याविषयी एक खुलासा केला ...

- सतीश डोंगरेबॉलिवूडमध्ये कास्टिंग काउच हा ज्वलंत विषय बनत असतानाच अभिनेत्री पूजा चोपडा हिने याविषयी एक खुलासा केला आहे. पूजाने म्हटले, ‘मी दारू पित नाही, सिगारेटही ओढत नाही मग कास्टिंग काउचचा प्रश्न येतोच कुठे ?’ मी एका चांगल्या परिवारातील आहे, बॉलिवूडमध्ये मिस इंडिया म्हणून मी एंट्री केली आहे. त्यामुळे मला कधीही असल्या प्रकारांचा सामना करावा लागला नाही. इंडस्ट्रीत असे प्रकार घडतही असतील, पण टॅलेंटच्या जोरावर जो पुढे येतो तोच अखेरपर्यंत इंडस्ट्रीत प्रवास करतो, असेही पूजाने स्पष्ट केले. नाशिकमध्ये आयएनआयएफडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आॅरा २०१८’ या फॅशन शोमध्ये सहभागी झालेल्या पूजाने पत्रकारांशी बोलताना विविध प्रश्नांची उत्तरे दिली. पूजाला कास्टिंग काउचविषयी विचारले असता तिने म्हटले की, मी इंडस्ट्रीत मिस इंडिया बनून आली. त्यामुळे मला कधीही अशाप्रकारचा सामना करावा लागला नाही. सध्या जगभरात #MeeToo हे कॅम्पेन चालविले जाते; परंतु मी कधीही या कॅम्पेनमध्ये भाग घेण्याचा विचार केला नाही. मी ड्रिंक करीत नाही, सिगारेटही ओढत नाही. मी दररोज साडेदहा वाजता झोपत असते. मला असे वाटते की, टॅलेंटवर करिअर करायला हवे. इंडस्ट्रीत असे प्रकार घडत असतील पण मी यापासून दूर असल्याचेही पूजाने सांगितले. यावेळी पूजाने पाकिस्तानी कलाकारांविषयीदेखील आपले मत व्यक्त केले. पूजाने म्हटले की, कलाकारांना कुठल्याही सीमांची बंधने नसायला हवीत. त्यांना आपली कला सादर करण्याची सगळीकडेच संधी मिळायला हवी. बॉलिवूडच्या प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण, इरफान खान, अनिल कपूर या कलाकारांनी हॉलिवूडमध्ये झेप घेऊन स्वत:ला सिद्ध केले. मग अशात तेथील कलाकारांना बॉलिवूडचे दरवाजे उघडे करून द्यायला हवेत. विशेषत: पाकिस्तानी कलाकारांवर कुठल्याही प्रकारची बंधने नसायला हवीत. मला जर इराकमध्ये जाऊन काम करायला मिळाले तर ते मला करता यावे, असेही पूजाने यावेळी स्पष्ट केले. पूजाच्या या मतानंतर ‘तुला ट्रोलर्सची भीती वाटत नाही काय ?’ असे विचारले असता, तिने याकडे इग्नोर करायला हवे असे स्पष्ट शब्दात सांगितले. यावेळी पूजाला ‘नन्ही कली’ या उपक्रमाविषयी विचारले असता, तिने मुली प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्ववान भरारी घेत असल्याचे सांगितले. आज प्रियांका चोप्राने आंतरराष्टÑीय स्तरावर जे यश मिळविले ते एखाद्या पुरुष कलाकारालाही मिळविता आले नसते. थोडक्यात प्रत्येक क्षेत्रात मुली भरारी घेत आहेत. स्वत:विषयी सांगायचे झाल्यास, मला तर नकोशी म्हणून माझ्या वडिलांनी नाकारले होते. माझ्या आईने माझा सांभाळ केला. त्यामुळे मुलींसाठी किंवा कुठल्याही सामाजिक कार्यासाठी माझा नेहमीच पुढाकार असणार आहे. यावेळी पूजाने मराठी चित्रपटातही काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पूजाने म्हटले की, माझी मराठी म्हणावी तेवढी चांगली नाही; परंतु संधी मिळाल्यास मला मराठीत काम करायला आवडेल. दरम्यान, आयएनआयएफडी फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूटच्या नाशिक शाखेतर्फे आयोजित केलेल्या ‘आॅरा २०१८’ या फॅशन शोमध्ये स्टाइलचा जलवा बघावयास मिळाला. या रंगारंग फॅशन सोहळ्यात नऊ फेºयांमध्ये २७ कलेक्शन सादर करण्यात आले. यावेळी नाशिककर फॅशनप्रेमी आणि पालकांनी एकच गर्दी केली होती. संस्थेच्या १५० विद्यार्थ्यांनी लहान मुलांसाठी फेअरी लॅण्ड, कू-कू, टायनी हायलाइट्स अशा फॅशन डिझाइन सादर केल्या. तर मोठ्यांसाठी ग्लॅब आॅफ ज्वेल, गुजराती, जोधपूरची संस्कृती दर्शविणारे डिझाइन यावेळी सादर करण्यात आले.