Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूजा बेदीच्या मुलीची छायाचित्रे वादात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 14:57 IST

पूजा बेदीची मुलगी अलिया लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तिने तिची काही छायाचित्रे सोशल मीडियावर टाकली ...

पूजा बेदीची मुलगी अलिया लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तिने तिची काही छायाचित्रे सोशल मीडियावर टाकली होती. त्यावरून वेगवेगळ्य़ा प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विशेषत: अलिया एब्राहीमने पोस्ट केलेल्या छायाचित्रांना निगेटीव्ह कॉमेंट सर्वाधिक आलेल्या आहेत. अलियाने अर्धवस्त्रातील छायाचित्रे टाकल्याने अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. या कॉमेंटमधील मालिनी हिची प्रतिक्रिया केवळ मला सपोर्ट करणारी होती. तिने केलेली कॉमेंट रिस्पेक्टफूल आणि चांगली आहे. मात्र, त्यालाही नकारात्मक प्रतिक्रिया आल्याने त्या वाचताना मला काहीसे दु:ख झाले, असे अलियाने म्हटले आहे. सगळेच माझ्या कपड्यांबद्दल आणि शारीरिक अवयवांबद्दल बोलतात. मात्र, माझे अस्तित्व केवळ तेवढय़ापुरते र्मयादित नाही, त्यापेक्षाही माझे व्यक्तिमत्त्व वेगळे आहे. लोकांनी काहीही प्रतिक्रिया दिल्या असल्या तरीही मी आता एक प्रदीर्घ श्‍वास घेतला असून, शांतपणे मी बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी सज्ज आहे. तोकड्या वस्त्रांमधील छायाचित्रांना माझी मान्यता असतेच असे नाही किंवा मी तसा आग्रहही धरत नाही, असेही तिने म्हटले आहे.