Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूजा आणि प्रभासची जमणार जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 15:19 IST

प्रभाससोबत काम करण्यास उत्सुक आहे. श्रद्धानंतर प्रभाससोबत स्क्रिन पूजा हेगडे शेअर करणार आहे.पूजा हेगडे तेलुगू आणि तमिळ इंडस्ट्रीतील खूप प्रसिद्ध चेहरा आहे.

ठळक मुद्देप्रभास आणि पूजा दिग्दर्शक के. के राधाकृष्ण यांच्या सिनेमात एकत्र दिसणार आहेतप्रभास सध्या साहोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे

प्रभाससोबत काम करण्यास उत्सुक आहे. श्रद्धानंतर प्रभाससोबत स्क्रिन पूजा हेगडे शेअर करणार आहे.पूजा हेगडे तेलुगू आणि तमिळ इंडस्ट्रीतील खूप प्रसिद्ध चेहरा आहे. तिने बॉलिवूडमध्ये 'मोहेंजोदारो'सारख्या चित्रपटातून डेब्यू केला आहे. प्रभास आणि पूजा दिग्दर्शक के. के राधाकृष्ण यांचा हा सिनेमा युव्ही क्रिएशन आणि गोपीकृष्ण मुव्हीज प्रोड्यूस करणार आहे. कृष्णम राजू हे प्रभासचे काका आहेत. यात ज्युनिअर एनटीआर आणि महेश बाबूसारखे कलाकार आहेत. प्रभासचा हा चित्रपटही हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये तयार होणार आहे. या चित्रपटाच्या नावाचा खुलासा अद्याप झालेला नाही.  युरोपच्या पार्श्वभूमीवर असलेला प्रभासचा हा आगामी सिनेमा बिग बजेट चित्रपट असणार आहे. 

प्रभास सध्या साहोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सुजीथ दिग्दर्शित ‘साहो’मध्ये श्रद्धा कपूरचा डबलरोल साकारताना दिसणार आहे. साहोच्या माध्यमातून पहिल्यांदाच श्रद्धा आणि प्रभास एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. केवळ इतकेच नाही तर प्रभासच्या तोडीला तोड असे अ‍ॅक्शन सीन्स करतानाही ती दिसणार आहे.  प्रभासचा हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि हिंदीत तयार होत आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूरसह, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश यासारख्या बॉलिवूड स्टार्सची वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे या अ‍ॅक्शन सीन्ससाठी बॉडी डबल घेण्यास प्रभासने नकार दिला आहे. त्यामुळे प्रभास स्वत: सगळे स्टंट सीन्स करतोय.

टॅग्स :प्रभासपूजा हेगडे