‘राजनीती २’ चा कॅटरिना भाग नसेल ? - प्रकाश झा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2016 22:09 IST
दिग्दर्शक प्रकाश झा यांनी २०१० मध्ये राजकीय-थ्रिलर-ड्रामा ‘राजनीती’ चित्रपट बनवला होता. त्यात कॅटरिना कैफ आणि रणबीर क पूर मुख्य ...
‘राजनीती २’ चा कॅटरिना भाग नसेल ? - प्रकाश झा
दिग्दर्शक प्रकाश झा यांनी २०१० मध्ये राजकीय-थ्रिलर-ड्रामा ‘राजनीती’ चित्रपट बनवला होता. त्यात कॅटरिना कैफ आणि रणबीर क पूर मुख्य भूमिकेत होते. प्रकाश झा म्हणत आहेत की,‘ कॅटरिना कैफ ‘राजनीती २’ चा भाग असेल की नाही माहित नाही. ते म्हणतात,‘कॅट राजनीतीचा भाग होती पण आता नव्या कथेत तिची भूमिका कितपत तिला साजेशी असेल याचा मी विचार करतोय. गोष्टी अजून शक्यतेवर आधारित आहेत. आम्हाला ती असणे म्हणजे पर्वणीच असेल पण तिची भूमिका जर अत्यंत वेगळी असेल तर ... चित्रपट अजून विचाराधीन आहे. अद्याप चित्रपटाच्या संदर्भात कुठलीच बाब ठरलेली नाही. झा पुढे म्हणतात,‘ अचानक मला राजनीती चित्रपट पुन्हा करावा वाटतोय यासाठी की देशातील राजनीती पुन्हा इंटरेस्टिंग बनली आहे. मी त्या स्ट्रक्चरवर काम करतोय. कदाचित आम्ही नवीन कथानक घेऊन परतू शकतो. किंवा त्याचा सिक्वेलही असू शकतो. स्क्रिप्ट बºयाच आहेत पण मला कोणती साजेशी आहे पहावे लागेल.’ source : india forums.com