Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमीषा पटेल पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी शिकविला धडा, वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 17:25 IST

अभिनेत्री अमीषा पटेल माझी पत्नी असल्याचा दावा करणाºया एका व्यक्तीला पोलिसांनी चांगलाच धडा शिकविला. पोलिसांनी त्याच्या डोक्यावरील प्रेमाचे भूत उतरविले. वाचा सविस्तर!

अभिनेत्री अमीषा पटेल हिने ज्या वेगाने इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली, त्याचवेगाने ती प्रेक्षकांच्या विस्मरणातही जात आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. हृतिक रोशनसोबत ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाºया अमिषाला अल्पावधितच बिग बजेट चित्रपट मिळत गेले. वास्तविक निर्माता-दिग्दर्शक राकेश रोशन यांनी ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटासाठी अगोदर करिना कपूरचे नाव निश्चित केले होते. मात्र करिनाची आई बबिता यांनी राकेश रोशनची ही आॅफर नाकारली. त्यानंतर राकेश रोशन यांनी अमीषा पटेल हिला संधी दिली. आज आम्ही अमीषा पटेलशी संबंधित एक रंजक किस्सा तुम्हाला सांगणार आहोत. अमीषा पटेलला पत्नी म्हणणाºया व्यक्तीला पोलिसांनी चांगलाच धडा शिकविला होता. हा किस्सा २०१० चा आहे. एका व्यक्तीने मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात फोन करून अमीषा पटेल माझी पत्नी असल्याचे सांगितले होते, तसेच तिच्यावर विविध स्वरूपाचे गंभीर आरोपही केले होते. पोलिसांनी या व्यक्तीच्या आरोपांची दखल घेताना त्यांनी अमीषाची चौकशी करण्यास सुरुवात केली. जेव्हा पोलिसांनी अमीषाला तिच्या लग्नाविषयी विचारले तेव्हा तिला धक्काच बसला. तिने त्या व्यक्तीचे सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच मी त्या व्यक्तीला ओळखत नसल्याचेही तिने सांगितले.  त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीची उलट तपासणी केली. फोनवर अमीषा पटेलचा पती सांगणाºया त्या व्यक्तीला पोलिसांनी शोधून काढले. तसेच त्याला असा काही चोप दिला की, त्याने काही क्षणातच सत्यकथा कथन केली. त्याने अमीषा माझी पत्नी नसल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी त्या व्यक्तीमधील प्रेमाचे भूत उतरविले. दरम्यान, अमीषा सध्या इंडस्ट्रीमधून गायब असली तरी, सोशल मीडियावर तिचा जलवा कायम आहे. ती नेहमीच आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर अपलोड करून चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने वन पीस पार्टी वियरमधील एक फोटो ट्विटर हॅण्डलवर शेअर केला होता. या फोटोमध्ये अमीषा मोकळे केस आणि लाल लिपस्टिकसह बघावयास मिळाली होती. या फोटोवरून ती ट्रोल झाली होती. या अगोदरही अमीषा तिच्या एका फोटोवरून ट्रोल झाली होती. यावेळी युजर्सनी तिच्यावर गंभीर टीका केली होती.