Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अडचणीत वाढ, घरी पोहोचले पोलीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 12:49 IST

बुढाना पोलीस नवाजच्या घरी पोहोचले.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार बुधवारी बुढाना पोलीस नवाजच्या घरी पोहोचले आणि त्यांनी मुंबईतील वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीबाबत चर्चा केली. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी जिल्हा पोलिसांकडेही संपर्क साधला आहे. मात्र, पोलीस नेमके नवाजच्या घरी का आले याचे कारण स्पष्ट झालेले नाही.  

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकीने मुंबईतल्या वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. नवाजने आपल्या भावाच्या मुलीशी अश्लील चाळे केल्याचा आरोप केला होता. विरोध केल्यावर नवाज आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिच्यावर ही घटना लपविण्यासाठी दबाव आणला होता.यासंदर्भात मुंबई पोलिसांनी जिल्हा एसएसपी यांना पत्र पाठवून माहिती मागविली आहे.

एसएसपी अभिषेक यादव यांच्या आदेशानुसार बुढाना पोलीस नवाजुद्दीन सिद्दीकीच्या घरी पोहोचले आणि त्यांना मुंबईत दाखल झालेल्या खटल्यांविषयी माहिती दिली. नवाजुद्दीनशी पोलिसांचा संपर्क साधला झाला की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच बुढाना पोलिसांनीदेखील यासंदर्भात काहीही स्पष्टीकरण दिले नाही.

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकी