Join us

‘कन्यादान’ने वाढवल्या आलिया भटच्या अडचणी! मुंबईत दाखल झाली तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 13:23 IST

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. होय, आलियाविरोधात मुंबईत तक्रार दाखल झाली आहे.

ठळक मुद्देआलियाची ही जाहिरात प्रदर्शित झाली, तेव्हापासूनच ती वादात सापडली आहे. तिची ही जाहिरात भारतीय समाजात अनेक वर्षांपासून चालत आलेल्या एका परंपरेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटच्या (Alia Bhatt) अडचणी वाढण्याची शक्यता आहे. होय, आलियाविरोधात मुंबईत तक्रार दाखल झाली आहे. कारण आहे, तिची नुकतीच प्रदर्शित झालेली जाहिरात. ‘कन्यादान’च्या जाहिरातीमुळे (Kanyadaan TV Ad) आलिया कायदेशीर वादात सापडली आहे.

आलियाने या जाहिरातीच्या माध्यमातून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप संबंधित तक्रारकर्त्याने केला आहे.  मुंबईच्या लोकक्रांती सामाजिक संघटनेने मान्यवर हा ब्रँड आणि आलिया भटविरोधात तक्रार दाखल केली आहे. संघटनेचे अध्यक्ष व पेशाने वकील असलेले विजेंद्र जाबराने यांनी संबंधित जाहिरात हिंदूविरोधी असल्याचा दावा केला आहे.

प्रदर्शित झाली तशीच वादात सापडली...

आलियाची ही जाहिरात प्रदर्शित झाली, तेव्हापासूनच ती वादात सापडली आहे. तिची ही जाहिरात भारतीय समाजात अनेक वर्षांपासून चालत आलेल्या एका परंपरेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. ‘मान्यवर मोहे’ हा कपड्यांचा एक ब्रँड आहे. याच्या जाहिरातीत आलिया भट्ट नवरीच्या साजश्रृंगारात मंडपात बसली आहे. यावेळी ती मुलीच्या मनात येणारे प्रश्न बोलून दाखवते. वडिलांचं घर मुलीचं का नसतं? मुलीला नेहमी परक्याचं धन का म्हटलं जातं? तिचं कन्यादान का केलं जातं? जाहिरातीच्या शेवटी मुलाचे आई-वडीलही आपल्या मुलाचा हात मुलीच्या हातात देण्यासाठी पुढे करतात आणि आलिया म्हणते, ‘नया आयडिया, कन्या मान’. काहींनी तिच्या या जाहिरातीची काही लोकांनी प्रशंसा केली. पण त्यापेक्षा अधिक या जाहिरातीवर टीकाही झाली.  सर्व धर्मात अनेक क्रूप्रथा, परंपरा आहेत. मग जाणीवपूर्वी हिंदू धर्मालाच का लक्ष्य केलं जातं, असा टीकाकारांचा सूर आहे. 

टॅग्स :आलिया भट