अक्षयचा हा मॅसेज वाचाच!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2016 19:55 IST
अक्षय कुमार व्यक्तिगत आयुष्यात नियमाने जगतो आणि समाजातील एक घटक या नात्याने इतरांनीही नियमाने जगावे, असे त्याचे मत आहे. त्याच्या ताज्या फेसबुक पोस्टवरून तरी हे जाणवते.
अक्षयचा हा मॅसेज वाचाच!!
अक्षय कुमार अभिनेता आहे पण त्यासोबतच तो समाजाप्रती एक जबाबदार व्यक्तिही आहे. त्याच्या अनेक कृतींमधून हे वेळोवेळी दिसते. मग ती दुष्काळग्रस्तांना मदत असो की महिलांसाठी स्वसंरक्षण शिबीर घेणे असो. अक्षय व्यक्तिगत आयुष्यात नियमाने जगतो आणि समाजातील एक घटक या नात्याने इतरांनीही नियमाने जगावे, असे त्याचे मत आहे. त्याच्या ताज्या फेसबुक पोस्टवरून तरी हे जाणवते. नुकताच अक्षयने एक व्हिडिओ पोस्ट केला. हा व्हिडिअो म्हणजे वाहतुकींच्या नियमांची भारतात कशी एैसीतैसी होते, याचे जिवंत उदाहरण आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ति एक नव्हे दोन नव्हे तर सहा जणांना एका बाईकवरून घेऊन जातो आहे. यापैकी पाच जण लहान मुले आहे. विशेष म्हणजे, हे कमी की काय, म्हणून या महाभागाने डोक्यात हेल्मेटही घातलेले नाही. हा व्हिडिओ पोस्ट करून अक्षयने त्याखाली सर्वांना शिकवण देणारा मॅसेज लिहिलाय...तुम्हीही हा मॅसेज वाचायला हवाच...अक्षयने लिहिलेय, "Always rooting for HOUSEFULL but never Scooterfull! Please don't ride this way that too without a helmet."