Join us

भाग्यश्रीची भूमिका करायला आवडेल- डेझी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 06:13 IST

अभिनेत्री डेझी शाहचा ड्रीम रोल म्हणजे मैने प्यार किया मधील सलमानसोबतचा भाग्यश्रीचा रोल आहे. याविषयी सांगतांना ती म्हणते,' मला ...

अभिनेत्री डेझी शाहचा ड्रीम रोल म्हणजे मैने प्यार किया मधील सलमानसोबतचा भाग्यश्रीचा रोल आहे. याविषयी सांगतांना ती म्हणते,' मला संजय लीला भन्साळी आणि विशाल भारद्वाज यांच्यासोबत काम करायला आवडेल. मैंने प्यार किया मधील भाग्यश्रीचा रोल जो सलमानसोबत रोमान्स करतो तो करायला आवडेल. चालबाजमधील श्रीदेवीची भूमिकाही मला आवडते. ' अभिनेत्री बनण्याअगोदर ती एक कोरिओग्राफर होती. मैंने प्यार कि या मध्ये मागील बाजूला डान्स ती करत होती त्यावेळी सलमानने तिला विचारले की,' तू अभिनयात करिअर करशील का?' तिने कोरिओग्राफी सोडून तीन वर्षे झाली आहेत. मी अभिनयावर लक्ष केंद्रित केले आहे. मी प्रत्येक क्षण आनंदी जगते. मी अभिनयाच्या क्षेत्रातही स्वत:ला वेगळे स्थान निर्माण केले आहे. विविध भूमिका करून मला माझे करिअर समृद्ध करायचे आहे.