Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘या’ ठिकाणी ठेवले जाईल श्रीदेवी यांचे पार्थिव; अंत्यविधीची तयारी पूर्ण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 17:11 IST

अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव सध्या भारतात आणण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या जात असून, आज रात्री ९ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव मुंबईमध्ये ...

अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव सध्या भारतात आणण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या जात असून, आज रात्री ९ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव मुंबईमध्ये आणले जाण्याची शक्यता आहे. बाथटबमध्ये श्रीदेवी यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दुबई पोलिसांनी त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरविल्यामुळेच श्रीदेवीचे पार्थिव भारतात आणण्यास विलंब होत आहे. दरम्यान, पोलिसांच्या तपासाला कपूर परिवार सामोरे गेला असून, सरकारी वकिलांकडून त्यांना याप्रकरणात क्लिन चीट दिली गेल्याची माहिती दुबई मीडियाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे पार्थिव आता परिवाराला सोपविले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, श्रीदेवी यांच्या मुंबईस्थित भाग्य बंगल्यात अंत्यविधीची संपूर्ण तयारी केली गेली असून, प्रत्येकाला आता श्रीदेवी यांचे अंतिम दर्शन घेण्याची आस लागली आहे. श्रीदेवी यांच्यावर अंतिम संस्कार मुंबई येथील विलेपार्लेस्थित पवनहंस मुक्तिधाम येथे केले जाणार आहे. त्यांच्या अखेरच्या इच्छेनुसार, अंत्यविधीसाठी आणण्यात आलेले सर्व साहित्य पांढºया रंगाचे असणार आहे. श्रीदेवी यांना पांढरा रंग खूपच आवडायचा. त्यांनी जिवंतपणीच आपल्या परिवारातील लोकांकडे ही इच्छा व्यक्त केली होती की, त्यांच्या अंत्ययात्रेत पांढºया रंगाचा वापर केला जावा. त्यामुळेच त्यांच्या बंगल्यातील सर्व पडदे पांढºया रंगाचे करण्यात आले आहे. त्याचबरोबर पांढºया रंगाच्या फुलांनीच त्यांचा अंत्यविधीचा रथ सजविण्यात आला आहे. दरम्यान, श्रीदेवी यांच्या मृत्यूची अनेक कारणे समोर आल्याने हा संपूर्ण प्रकार गुंतागुंतीचा होत गेला. आता ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून, श्रीदेवी यांचे पार्थिव कुटुंबीयांना लवकरच सोपविले जाण्याची शक्यता आहे. सूत्रानुसार सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान दुबईहून श्रीदेवीचे पार्थिव मुंबईच्या दिशेने रवाना केले जाईल. तसे झाल्यास रात्री ९ वाजेपर्यंत श्रीदेवीचे पार्थिव मुंबईमध्ये येण्याची शक्यता आहे.