Join us
Daily Top 2Weekly Top 5

'पीके' फेम अभिनेत्रीचं मोडलं दुसरं लग्न, १३ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 18:47 IST

या अभिनेत्रीनं २०१० मध्ये दुसरे लग्न केले होते.

'पीके' आणि 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' सारख्या चित्रपटात दिसलेली अभिनेत्री रुखसार रहमान पती फारुख कबीरपासून घटस्फोट घेत आहे. दोघांनी २०१० मध्ये लग्न केले होते आणि आता ते वेगळे होत आहेत. विभक्त होण्याचा हा निर्णय रुखसार फारुकीसाठी भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक होता. रुखसार रहमान आणि कबीर फारुकी फेब्रुवारी २०२३ पासून वेगळे राहत आहेत. रुखसार आणि कबीर फारुकी यांचा घटस्फोट का होत आहे, याबाबत जोडप्याच्या बाजूने काहीही सांगण्यात आलेले नाही. 

ईटाइम्सला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुखसार रहमानला अशा काही गोष्टींची माहिती मिळाली होती जी तिला सहन होत नव्हती. या गोष्टी उघडकीस आल्यावर रुखसारने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. तिची प्रकृती सध्या चांगली नाही. रुखसार रहमानने ETimes शी बोलताना फारुक कबीरसोबत घटस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रुखसार म्हणाली, 'हो, आम्ही वेगळे झालो आहोत. आम्ही फेब्रुवारीपासून वेगळे राहत आहोत आणि घटस्फोट घेणार आहोत. घटस्फोटाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यामुळे मी सविस्तर सांगू शकत नाही. माझ्यासाठी हा निर्णय अजिबात सोपा नव्हता. घटस्फोट का होत आहे, त्याचे कारण काय आहे, मला त्याच्या तपशिलात जायचे नाही, मला ते आणखीन घाणेरडे करायचे नाही.

फारुख कबीर घटस्फोटावर म्हणाला...दुसरीकडे, दिग्दर्शक फारुख कबीर यांनी रुखसारपासून घटस्फोटावर सांगितले की, 'मी खूप खाजगी व्यक्ती आहे आणि ही खाजगी बाब आहे. मला आत्ता त्याबद्दल बोलायचे नाही.

रुखसारचे पहिले लग्न झाले होते असद अहमदसोबत रुखसार रहमान आणि फारुख कबीर यांनी २०१० मध्ये लग्न करण्यापूर्वी सहा वर्षे एकमेकांना डेट केले होते. 'खुदा हाफिज २' या चित्रपटात दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम केले होते. फारुख कबीरच्या आधी रुखसारचे लग्न असद अहमदशी झाले होते आणि त्यांना आयशा अहमद नावाची मुलगी आहे.