Join us

पिंक पॅरिसमध्ये रणवीर झाला ‘गुलाबी’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2016 10:08 IST

 पॅरिस म्हणजे पृथ्वीवरील सर्वांत जास्त रोमँटिक ठिकाण. कोणत्याही कलाकाराला तिथे शूटिंग करायचे असेल तर तो एवढा आनंदून जाईल की, ...

 पॅरिस म्हणजे पृथ्वीवरील सर्वांत जास्त रोमँटिक ठिकाण. कोणत्याही कलाकाराला तिथे शूटिंग करायचे असेल तर तो एवढा आनंदून जाईल की, त्यांच्यातील अभिनय स्वत:हूनच बाहेर येईल. रणवीर सिंग एखादी भूमिका करत असेल तर त्या भूमिकेत इतका एकाग्र होतो की त्याला कुठलेच भान राहत नाही.सध्या तो ‘बेफिक्रे’ चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतो आहे. वेगवेगळे प्रयोग आणि थीम्सवर काम करायला त्याला आवडते. नुकतेच चित्रपटाच्या शूटिंगवेळीचे काही फोटो आऊट करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये तो गुलाबी शर्टमध्ये दिसत असून त्याने हेल्मेटही घातलेले दिसत आहे. त्याला ‘स्कूटर’ सीन साकारायचा होता म्हणे.तरी किती क्यूट दिसतो आहे ना तो! आदित्य चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंग आणि वाणी कपूर एकत्र प्रथमच दिसणार आहेत. रणवीर या चित्रपटाविषयी खुप उत्सुक असल्याचे त्याने सांगितले आहे. आदित्य चोप्रा हे त्याचे गुरू असून त्यांच्यासोबत काम करायला त्याला नेहमीच आवडते.