Join us

मिथुन चक्रवर्ती यांनी कचराकुंडीत सापडलेल्या मुलीला घेतले होते दत्तक, आता दिसते एखाद्या अभिनेत्रीइतकी सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 17:26 IST

मिथुन चक्रवर्ती यांनी एका मुलीला दत्तक घेत तिचे संपूर्ण आयुष्य बदलवले आहे.

ठळक मुद्देदिशानी काही वर्षांपूर्वी एका कचराकुंडीत सापडली होती. चिमुकल्या दिशानीला कचरा कुंडीत फेकून तिच्या आई-वडिलांनी पळ काढला होता. त्या रस्त्यावरून अनेकजण गेले.

बॉलिवूड स्टार मिथुन चक्रवर्ती यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट देत अनेक वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता त्यांनी एका नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. त्यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मिथुन हे एक चांगले अभिनेते असण्यासोबतच एक खूप चांगले व्यक्ती देखील आहेत. 

मिथुन चक्रवर्ती यांनी एका मुलीला दत्तक घेत तिचे संपूर्ण आयुष्य बदलवले आहे. दिशानी काही वर्षांपूर्वी एका कचराकुंडीत सापडली होती. चिमुकल्या दिशानीला कचरा कुंडीत फेकून तिच्या आई-वडिलांनी पळ काढला होता. त्या रस्त्यावरून अनेकजण गेले. पण जीवाच्या आकांताने रडणाऱ्या त्या चिमुकलीला पाहून कुणी तिला दत्तक घेण्याचा विचार केला नाही. एका बंगाली न्यूजपेपरमध्ये ही बातमी आली होती आणि मिथुन यांनी ही बातमी वाचून या चिमुकलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.

मिथुन यांची पत्नी योगिता बालीनेही दिशानीचे मनापासून स्वागत केले. दिशानी प्रचंड स्टायलिश आणि सुंदर आहे. बॉलिवूड स्टार बनण्याचे सगळे गुण तिच्यात आहेत. दिशानीशिवाय मिथुनला तीन मुलगे आहेत. महाक्षय, उष्मे आणि नमाशी चक्रवर्ती अशी त्यांची नावे आहेत. सध्या दिशानी न्यूयॉर्क फिल्म अकादमीत अ‍ॅक्टिंग शिकतेय. दिशानी सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिने स्वत:चे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत. यात फोटोंमध्ये ती न्यूयॉर्क फिल्म अकादमीच्या फ्रेन्ड्ससोबत दिसतेय.

दिशानी लवकरच बॉलिवूडमध्ये येणार, असल्याचे देखील म्हटले जाते. दिशानी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. रोज तिचे नव नवे ग्लॅमरस फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोतील तिच्या अदा पाहून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यास ती अगदी तयार असल्याचे दिसतेय.

टॅग्स :मिथुन चक्रवर्ती