Join us

गाउनमधील फोटोंवरून ट्रोलर्सनी ईशा गुप्तावर पुन्हा साधला निशाणा, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 16:37 IST

अभिनेत्री ईशा गुप्ता हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर गाउनमधील काही फोटोज् शेअर केले, ज्यामुळे ट्रोलर्सनी पुन्हा एकदा तिच्यावर निशाणा साधला आहे.

गेल्या मंगळवारी मुंबई येथे झालेल्या ब्रॅण्ड व्हिजन शिखर संमेलनात उपस्थित असलेल्या अभिनेत्री ईशा गुप्ताला तिच्या गाउनवरून ट्रोल केले जात आहे. ईशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटोज् शेअर केले, ज्यामध्ये तिने तान्या खानुजा हिने डिझाइन केलेला गाउन परिधान केल्याचे दिसत आहे. या गाउनवर तिने काही हिºयांची आभूषणेही कॅरी केली होती. मात्र ईशाने हे फोटो शेअर करताच युजर्सकडून त्यास उलटसुलट कॉमेण्ट्स देण्यास सुरुवात झाली. युजर्सनी लिहिले की, ‘जास्त एक्सपोज करू नको... हे चांगले दिसत नाही.’ एका युजर्सने तर ईशाला या गाउनवरून अतिशय अश्लील प्रतिक्रिया दिली. ईशाने शेअर केलेल्या जवळपास प्रत्येक फोटोला युजर्सनी कॉमेण्ट दिल्या.  वास्तविक ईशाला तिच्या फोटोंवरून पहिल्यांदाच ट्रोल केले असे नाही, तर यापूर्वीदेखील तिने जेव्हा बिकिनीतील फोटो शेअर केले होते, त्यावेळेसदेखील तिला असेच ट्रोल करण्यात आले होते. यावरून जेव्हा तिला विचारण्यात आले तेव्हा एका समाचार एजन्सीबरोबर बोलताना तिने म्हटले होते की, ‘ट्रोलर्स हे असे लोक आहेत, जे खºया अर्थाने रिकामटेकडे आहेत. त्यांच्याकडे जीवनात करण्यासारखे काहीच नाही. हे केवळ सेलिब्रिटींनाच ट्रोल करीत नाहीत, तर प्रत्येकावरच टीका करण्याचा यांनी ठेका घेतला आहे.’  दरम्यान, ईशाप्रमाणे दीपिका पादुकोण, प्रियंका चोपडा, सोहा अली खान, सनी लिओनी आणि फातिमा सना शेख यांनाही कपड्यांवरून ट्रोल करण्यात आले आहे. ईशाच्या बॉलिवूड करिअरबद्दल सांगायचे झाल्यास तिने २०१६ मध्ये अभिनेता अक्षयकुमार याच्यासोबत ‘रुस्तम’ या चित्रपटात काम केले. त्याचबरोबर ‘राज, थ्रीडी, जन्नत-२ आणि हमशकल्स’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले. अखेरीस ती अजय देवगण स्टारर ‘बादशाहो’मध्ये बघावयास मिळाली. सध्या ती ‘आंखे-२’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.