Join us
Daily Top 2Weekly Top 5

Photo Viral : राणी मुखर्जीच्या चिमुकलीची पहा पहिली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2017 17:59 IST

अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा पती दिग्दर्शक, निर्माता आदित्य चोपडा पहिल्यांदाच मुलगी आदिरासोबत बघावयास मिळाला. खरं तर राणी आणि आदित्य ...

अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा पती दिग्दर्शक, निर्माता आदित्य चोपडा पहिल्यांदाच मुलगी आदिरासोबत बघावयास मिळाला. खरं तर राणी आणि आदित्य दोघेही मुलगी आदिराला मीडियापासून दूर ठेवले आहे. त्यामुळेच आदिराचा एकही फोटो अद्यापपर्यंत सोशल मीडियावर आलेला नाही. आता पहिल्यांदाच आदिराची झलक बघावयास मिळाल्याने पापासोबतचा आदिराचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये आदित्य मुलगी आदिराला कडेवर घेऊन उभा असलेला दिसत आहे. आदिराचा हा पहिलाच फोटो आहे, ज्यामध्ये तिचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे. खरं तर आदिराच नव्हे तर आदित्य चोपडा क्वचितच कॅमेºयासमोर येत असतो. आदिराचा जन्म ९ डिसेंबर २०१५ मध्ये झाला होता. तेव्हापासून ही पहिलीच वेळ आहे, ज्यात ती पापा आदित्यसोबत दिसत आहे. या अगोदर राणीने आदिराच्या पहिल्या बर्थडेला तिचा फोटो फॅन्ससाठी शेअर केला होता; मात्र त्यात अस्पष्ट दिसत होती. राणीने नुकतेच कन्फर्म केले की ती, लवकरच ‘हिचकी’ या सिनेमातून मोठ्या पडद्यावर परतणार आहे. सध्या ती याच सिनेमानिमित्त व्यस्त असून, आदिरा पापा आदित्यसोबत वेळ व्यतित करीत आहे. आदिरा एक वर्षाची झाल्यानेच राणीने बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याचे ठरविले होते. सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांच्या दिग्दर्शनात तयार होत असलेल्या या सिनेमाला मनीष शर्मा हे प्रोड्यूस करत आहेत. याविषयी राणीने खुलासा करताना म्हटले होते की, मी अशा एका स्क्रिप्टच्या शोधात आहे, जे मला चॅलेंजेबल वाटेल. ‘हिचकी’या सिनेमात काम करण्याची संधी मिळाल्याने माझा शोध संपला आहे.