Join us

आलियाने शेअर केला वरूणसोबतचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 11:51 IST

आलिया भट्ट आणि वरूण धवन हे बॉलीवूडमधील सर्वांत हॉटेस्ट कपलपैकी एक समजले जाते. त्यांच्या ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ चित्रपटाची शूटींग ...

आलिया भट्ट आणि वरूण धवन हे बॉलीवूडमधील सर्वांत हॉटेस्ट कपलपैकी एक समजले जाते. त्यांच्या ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ चित्रपटाची शूटींग त्यांनी सुरू केली आहे. ‘ड्रीम टीम टूर २०१६’ वरून परत आल्यानंतर पुन्हा एकदा ही जोडी कामाकडे लक्ष देतांना दिसत आहे.आलियाने वरूणसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. याला तिने कॅप्शन दिले आहे की,‘ प्रेप टाईम फॉर बद्री अ‍ॅण्ड द दुल्हनिया.’ या फोटोत ते दोघे काहीतरी संवाद साधतांना दिसत आहेत. हा चित्रपट या दोघांचा तिसरा एकत्र चित्रपट आहे. याअगोदर त्यांनी ‘स्टुडंट आॅफ दी ईयर’ आणि‘ हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ यात काम केले होते.