या गायकाने शेअर केला त्याच्या साखरपुड्याचा फोटो, लवकरच चढणार बोहल्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 10:28 IST
'आशिकी 2' गायक अंकित तिवारीने साखरपुडा केला आहे. अकिंतने पार्श्वगायनसोबत चित्रपटांसंगीत देखील दिले आहे. साखरपुड्याचा फोटो अंकितने सोशल मीडियावर ...
या गायकाने शेअर केला त्याच्या साखरपुड्याचा फोटो, लवकरच चढणार बोहल्यावर
'आशिकी 2' गायक अंकित तिवारीने साखरपुडा केला आहे. अकिंतने पार्श्वगायनसोबत चित्रपटांसंगीत देखील दिले आहे. साखरपुड्याचा फोटो अंकितने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अंकितने 23 फेब्रुवारी मॅकेनिकल इंजिनिअर पल्लवी शुक्लासोबत लग्नाचा बेडीत अडकणार आहे. या फोटोला अंकितने कॅप्शन सुद्धा दिले आहे की, मी संपूर्ण आयुष्य तुझावर प्रेम करेन, तुझी काळजी घेऊन आणि रिसपेक्ट करेन. 23 फेब्रुवारीला अंकित कानपूरमध्ये सात फेरे घेणार आहे. 26 फेब्रुवारीला अंकित मुंबईत देखील रिसेप्शन ठेवणार आहे. अंकितच्या आजीला झांसी रेल्वे स्टेशनवर एक सुंदर मुलगी भेटली होती. अंकितच्या आजीला पल्लवी ऐवढी आवडली की तिने घरी अंकित आणि पल्लवीच्या लग्नाची बोलणी केली. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांकडून या लग्नासाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला. अंकितने एका इंटव्ह्रु दरम्यान पल्लवीबाबत बोलताना सांगितले होते की, पल्लवीचा साधापणा त्याला सगळ्यात जास्त आवडल्याचे त्यांने सांगितले. 'सून रहा है ना तू' या गाण्याने अंकितने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवले आहे. अंकितची सुरेख गायिका होती. पण त्या फक्त भजन, जागणरण अशा प्रकारचे गाणे गात असे. अंकितला बॉलिवूडची ओढ लागली होती. त्यामुळे त्याचे ध्येय मुंबईत होते. त्यासाठी त्यांने खूप स्ट्रगल केल्याचे त्यांनेएक इंटरव्ह्रु दरम्यान सांगितले होते. पुढे तो म्हणाला होता की, ''आयुष्यात चांगुलपणा हा नेहमी अंगी बाळगला गेला पाहिजे. ती एक जिद्द असली पाहिजे. कारण चांगुलपणाच माणसाला जीवनात यशस्वी करतो. हा कोणता फिल्मी डायलॉग नसून मी स्वत: हे अनुभवलं आहे.'' कामाबाबतीत नेहमी प्रामाणिक राहिले गेले पाहिजे. मी आयुष्यात नेहमी कोणतही गाणं गाताना माझं पहिलं गाणं म्हणूनच गातो. आणि त्याला शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि सराव करण्यावर माझा विश्वास आहे. कारण चूकातूनच माणूस शिकत असतो. यावेळी अंकितने मराठीत पार्श्वगायन करण्याची इच्छादेखील व्यक्त केली होती.