अभिनेत्री मलायका अरोरा नेहमी तिचा कुत्रा कॅस्परसोबत दिसते. कधी मलायका घरात त्याच्यासोबतचे फोटो शेअर करत असते तर कधी त्याच्यासोबत वॉक करताना दिसते. मलायकाचे कॅस्परवर किती प्रेम आहे, हे सांगायला नको. ते तिच्या पोस्टमधून पहायला मिळते. आता मलायका अरोराने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे आणि त्यात ती कॅस्परसोबत दिसते आहे. या फोटोच्या माध्यमातून तिने कॅस्पर सहा वर्षांचा झाला असल्याचे सांगितले आहे.
मलायका अरोराने कॅस्परचा बर्थडे नुकताच साजरा केला आणि केक कटिंगदेखील केला. कॅस्परचा मलायका अरोराचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोतून मलायकाचा कॅस्परवर किती जीव आहे, हे समजते आहे.