Join us
Daily Top 2Weekly Top 5

मामा-भाच्याचा ‘हा’ फोटो इंटरनेटवर होतोय व्हायरल; मात्र फोटोत आहे एक ट्विस्ट वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2017 14:09 IST

सध्या मामा भाच्याचा हा फोटो इंटरनेटवर वाºयासारखा व्हायरल होत असून, त्यास नेटिझन्सकडून पसंती मिळत आहे. मात्र या फोटोमध्ये एक गंमत असून, ती तुम्हाला खाली दिलेली माहिती वाचल्यानंतर लक्षात येईल.

‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका एफ एम रेडिओच्या कार्यालयात गेलेल्या अभिनेता रणबीरला जेव्हा भाचा तैमूरचा फोटो दाखविण्यात आला होता, तेव्हा त्याने ‘कोण आहे हा?’ असा प्रश्न केला होता. तेव्हापासूनच रणबीर भाचा तैमूरला भेटण्यासाठी आतुर झाला होता. आता त्याने आपल्या लाडक्या भाच्याची भेट घेतली असून, त्याच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सध्या मामा भाच्याचा हा फोटो इंटरनेटवर वाºयासारखा व्हायरल होत असून, त्यास नेटिझन्सकडून पसंती मिळत आहे. मात्र या फोटोमध्ये एक गंमत असून, ती तुम्हाला खाली दिलेली माहिती वाचल्यानंतर लक्षात येईल. सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांचा शहजादा तैमूर जन्मल्यापासूनच चर्चेत आहे. आतापर्यंत त्याचे जेवढे फोटो समोर आलेत त्या सर्व फोटोंना नेटिझन्सनी प्रचंड पसंती दिली. विशेष म्हणजे मम्मी करिनासोबत जेव्हा तैमूर स्पॉट होतो, तेव्हा करिनाचाही चार्म त्याच्यासमोर कमी दिसतो. आम्ही ठामपणे सांगू शकतो की, तैमूरचा प्रत्येक फोटो क्यूट आहे. कारण आतापर्यंत त्याचे जेवढे फोटो समोर आलेत, ते फोटो पाहून कोणीही त्याचे प्रेमात पडले नसेल तरच नवल. आता असाच एक मामा भाच्याचा म्हणजेच रणबीर आणि तैमूरचा फोटो समोर आला असून, इंटरनेटवर हा फोटो वाºयासारखा व्हायरल होत आहे.  जेव्हा रणबीर एका एफ एम रेडिओ चॅनलच्या कार्यालयात पोहोचला होता, तेव्हा त्याने म्हटले होते की, जेव्हा तैमूर तीन महिन्यांचा होता, तेव्हा मी त्याला बघितले होते. यावेळी त्याने तैमूरचा लेटेस्ट फोटो बघून आश्चर्य व्यक्त केले होते. तेव्हापासून चाहत्यांना रणबीरने आपल्या भाच्यासोबत एखादा फोटो काढावा, अशी अपेक्षा होती. त्यानुसार रणबीरचा हा फोटो समोर आला आहे. फोटोमध्ये तैमूर खूपच गोंडस दिसत आहे. मात्र तुम्ही या फोटोच्या प्रेमात पडाल त्याअगोदरच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, हा फोटो खरा नसून फोटोशॉपमध्ये केलेला आहे. रणबीरच्या एका चाहत्याने अतिशय सफाईदारपणे फोटोशॉपमध्ये दोघांना एकत्र दाखविले आहे. हा फोटो बघून कोणालाही विश्वास बसेल की, दोघांनी फोटोशूट केले असावे. पण काहीही असो, फोटो जरी खरा नसला तरी, त्यामध्ये मामा-भाचा खूपच सुंदर दिसत आहेत. आता रणबीरच्या चाहत्यांची एकच अपेक्षा आहे ती म्हणजे दोघांनी लवकरच एकत्र येऊन त्यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करावा. असो, तैमूरविषयी सांगायचे झाल्यास लवकरच तो मम्मी करिनासोबत विदेशवारीला जाणार आहे. हा त्याचा पहिलाच विदेश दौरा असेल. करिना एका जाहिरातीच्या कॅम्पेनसाठी लंडनला जाणार असून, ती तैमूरलाही सोबत घेऊन जाणार आहे.