Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्यावरती डाव मोडला...!; संजय दत्त आणि रिचा शर्माचा संसार मोडण्यामागे ही व्यक्ती कारणीभूत, नाव वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 17:30 IST

संजय दत्तच्या आयुष्यात आलेल्या या व्यक्तीमुळे त्याच्या वैवाहिक जीवनात आलं वादळ

बॉलिवूडमध्ये असे बरेच जोडपे आहेत. ज्यांच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली आणि ते वेगळे झाले. यापैकी एक कपल म्हणजे अभिनेता संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी रिचा शर्मा. संजय दत्त आणि रिचा शर्माचे नाते तुटण्यामागे माधुरी दीक्षित कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.

संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या अफेयरबद्दल सर्वांनाच माहित आहे. साजन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांचे प्रेम प्रकरण चर्चेत आले होते, ज्यामुळे संजयच्या वैवाहिक जीवनात मोठे वादळ आले होते. संजय दत्त त्यावेळी विवाहित होता, त्याला रिचा पासून एक मुलगी आहे. एकीकडे जिथे रिचा आपल्या कर्करोगाच्या उपचारासाठी युएसला गेली होती. तर दुसरीकडे संजय आणि माधुरीच्या अफेयरचे किस्से व्हायरल होत होते. अशात ही बातमी रिचाला समजली तेव्हा रिचा कोलमडून गेली होती.

...यामुळे आमच्या नात्यात आला दुरावासंजय दत्त आणि माधुरी दीक्षितबद्दल बोलताना रिचा शर्माने एका मुलाखतीत सांगितले होते की, माझी इच्छा आहे की संजय माझ्या आयुष्यात परत यावा. आम्ही दोघे बराच काळ एकमेकांपासून दूर राहत आहोत, त्यामुळे आमच्या नात्यात दुरावा आला आहे. मी संजयला विचारले होते की तुला वेगळे व्हायचे आहे का?, त्यावर त्याने स्पष्ट नकार दिला. मलादेखील त्याच्यापासून वेगळे व्हायचे नव्हते. फक्त मला माझे लाइफ परत हवे आहे. जे काही झाले ते विसरायला मी तयार आहे. माझे त्याच्यावर खूप प्रेम आहे. तो फक्त माझ्या जीवनात असावा.

संजय दत्तला काहीच फरक पडला नाहीमात्र रिचाच्या या गोष्टींचा संजय दत्तवर अजिबात फरक पडला नाही. त्याने फक्त रिचा शर्मासोबत घटस्फोट घेतला नाही तर मुलीला पण एकटे सोडले. यावर रिचा शर्माची बहिण एना शर्मा म्हणाली होती की, माधुरी दीक्षितमध्ये जराही माणूसकी नाही. माधुरीला कोणीतरी दुसरा मिळू शकतो. मात्र तिने एका अशा पुरूषाची निवड केली जो विवाहित होता. त्यामुळे माझी बहीण एकटी जीवन व्यतित करते आहे.भलेही आज माधुरी आणि संजय दत्तमध्ये कोणते नाते नाही मात्र एकवेळी ते एक कपल्स होते. या नात्यामुळे संजय दत्त आणि त्याची पत्नी रिचा कायमचे वेगळे झाले. 

टॅग्स :संजय दत्तमाधुरी दिक्षित