Join us
Daily Top 2Weekly Top 5

परिणीतीला ‘ताकधूम’च्या सेटवर दुखापत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2016 09:29 IST

‘चुलबुली’ परिणीती चोप्रा सध्या ‘ताकधूम’ या चित्रपटात बिझी आहे. काल-परवा परिणीती दिवाळी पार्टी सहभागी होण्यासाठी दिल्लीत पोहोचली. यावेळी तिच्या ...

‘चुलबुली’ परिणीती चोप्रा सध्या ‘ताकधूम’ या चित्रपटात बिझी आहे. काल-परवा परिणीती दिवाळी पार्टी सहभागी होण्यासाठी दिल्लीत पोहोचली. यावेळी तिच्या पायावर मलमपट्टी केलेली दिसली. शूटींगदरम्यान परिणीती जखमी झाल्याचे यानंतर कळले. दिल्ली विमानतळावर परिणीती उतरली तेव्हा ती हॉट पँन्ट आणि टी-शर्ट अशा कॅज्युअल अवतारात दिसली.तिच्या डाव्या गुडघ्यावर मलमपट्टी केलेली यावेळी स्पष्टपणे दिसले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ताकधूम’च्या सेटवर परिणीतीच्या गुडघ्याला दुखापत झाली. पण ती फारशी गंभीर नसावी. कारण दिल्ली विमानतळावर या जखमेमुळे परिणीतीला कुठल्याहीप्रकारे त्रास होतोय, असे वाटले नाही. ती मस्तपैकी हसत हसत फोनवर गप्पा मारताना दिसली.यानंतर संध्याकाळी तिच्या मित्राच्या दिवाळी पार्टीतही सहभागी झाली. ‘ताकधूम’ या चित्रपटात परी सुशांत सिंह राजपूतसोबत दिसणार आहे. सुशांत व परिणीती याआधी ‘शुद्ध देसी रोमान्स’मध्ये एकत्र दिसले होते. मात्र हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नव्हता. ‘ताकधूक’च्या निमित्ताने ही जोडी पुन्हा एकत्र आली आहे. अलीकडे परिणीतीने ‘मेरी प्यारी बिंदू’ची शूटींग संपवली आणि ती लगेच ‘ताकधूम’मध्ये बिझी झाली.                        प्रारंभी ‘ताकधूम’साठी सैफ अली खानची मुलगी सारा खान हिचेही नाव चर्चेत होते. तारखा नसल्यामुळे परिणीती हा चित्रपट करणार नाही, अशी चर्चा होती. मग साराने हा चित्रपट साईन केला, अशीही बातमी आली. पण या बातम्या अफवाच ठरल्या. अखेर परिणीतीच हा चित्रपट करणार, हे स्पष्ट झाले आहे.