Join us

परफेक्ट ‘खानदान’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2016 12:36 IST

संपूर्ण कुटुंब एकत्र आले तरच खरा सण आणि उत्सव असतो. त्यामुळे नुकत्याच झालेला रक्षाबंधनाचा सण सामान्य नागरिकांसह सेलिब्रिटींच्या घरीही ...

संपूर्ण कुटुंब एकत्र आले तरच खरा सण आणि उत्सव असतो. त्यामुळे नुकत्याच झालेला रक्षाबंधनाचा सण सामान्य नागरिकांसह सेलिब्रिटींच्या घरीही जय्यत पद्धतीने साजरा झाला. सलमान खान आणि त्याचे संपूर्ण खान कुटुंबीय या सणाला एकत्र आले होते.घरचे आणि नातेवाईक या सणासाठी जमले. बहिणी अल्विरा आणि अर्पिता, त्यांचे पती अतुल आणि आयुष आणि इतरही. सलीम खान हे त्यांच्या पत्नी सलमा खान आणि हेलेन यांच्यासोबत दिसत आहेत. सर्वजण फॅमिली फोटो म्हणून पोझ देत आहेत.अरबाज खान सध्या हैदराबादमध्ये चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त असून तो या सेलिब्रेशनमध्ये दिसत नाहीये. अमृता अरोरा खान हिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.