Join us
Daily Top 2Weekly Top 5

​लोकांना पाहायचाय, ‘3 इडिएट्स’, ‘पीके’चा सिक्वेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2016 19:23 IST

दिग्दर्शक राजकुमार हिरानी म्हणजे आॅल टाईम हिट डायरेक्टर. मुन्नाभाई सिरिजपासून 3 इडियट्स,पीके असे त्यांचे सर्व चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतले. ...

दिग्दर्शक राजकुमार हिरानी म्हणजे आॅल टाईम हिट डायरेक्टर. मुन्नाभाई सिरिजपासून 3 इडियट्स,पीके असे त्यांचे सर्व चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतले. राजकुमार हिरानी यांचा प्रत्येक सिनेमा म्हणजे फ्रेश आणि मनोरंजक़ सध्या संजय दत्तच्या बायोपिकमध्ये बिझी आहेत. या बायोपिकनंतर राजकुमार हिरानींचा पुढचा प्रोजेक्ट काय असेल, हे ठाऊक नाही. पण प्रेक्षकांनी मात्र त्यांना ‘३ इडिएट्स आणि पीके’ या दोन चित्रपटांच्या सिक्वलसाठी साकडे घातले आहे. या दोन चित्रपटांचा सिक्वेल बनवा, अशी गळ राजकुमार हिरानी यांना घातली जात आहे. अशी गळ घालणारी जगभरातून अनेक पत्रं हिरानी यांना आत्तापर्यंत मिळाली आहेत. खुद्द हिरानी यांनीच हा दावा केला आहे. आता चाहत्यांचा ही मागणी राजकुमार हिरानी किती मनावर घेतात, ते बघूच..!!