Join us
Daily Top 2Weekly Top 5

पीसीला आजही असते वडीलांच्या परतीची ‘आशा ’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 09:49 IST

काही दिवसांपूर्वीच प्रियंका चोप्राच्या आजीचा मृत्यू झाला. सहा वर्षे वय असतानांपासून तिच्या आजीने तिला सांभाळले आहे. आजी जाण्याने प्रियंका ...

काही दिवसांपूर्वीच प्रियंका चोप्राच्या आजीचा मृत्यू झाला. सहा वर्षे वय असतानांपासून तिच्या आजीने तिला सांभाळले आहे. आजी जाण्याने प्रियंका चोप्राला प्रचंड दु:ख झाले आहे. आजीच्या जाण्याने तिला तिच्या वडीलांची खुप आठवण आली.तिच्या वडीलांचा मृत्यू होऊन देखील खुप वर्षे झालीत. पण एका मुलाखतीदरम्यान बोलताना ती म्हणते,‘ तो काळच वेगळा होता. मी आजही माझे वडील मला सोडून गेलेत हे स्विकारू शकत नाही.मी जेव्हा घरी येते तेव्हा मला आजही वाटते की, ते येतील. मला वाटतं की, दु:ख हा आपला सोबती असतो. तुम्हाला त्याच्यासोबतच जगायला शिकायला हवं. ’ खरंच पीसी किती समजूतदारपणासारखं बोलतेस गं तू...!