Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘क्वांटिको’ सीजन २ साठी पीसीची शूटींग सुरू...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 11:07 IST

अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ सीजन २ चे शूटींग नुकतेच सुरू झाले आहे. पीसीने तिच्या क्वांटिको च्या टीमसोबतचे फोटो सोशल ...

अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ सीजन २ चे शूटींग नुकतेच सुरू झाले आहे. पीसीने तिच्या क्वांटिको च्या टीमसोबतचे फोटो सोशल मीडीयावर पोस्ट केले आहेत. एक सीन शूट करत असतानांचा फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.यात ती निळ्या रंगाचा टॉप, ग्रे कोट आणि ट्राऊझर्समध्ये दिसत आहे. या फोटोला तिने ‘डे फर्स्ट आॅन सेट फॉर क्वांटिको! रेडी फॉर टॉम’ गुडनाईट वर्ल्ड! अ‍ॅलेक्स पेरिश आॅन हर वे टू युअर टीव्ही स्क्रिन्स इन सप्टेंबर. सी यू सून..’काही दिवसांपूर्वीच तिचा क्वांटिको सीजन २ च्या स्टारकास्टसोबत डिनर करतांनाचा फोटो व्हायरल झाला होता. वेल, तर आता अ‍ॅलेक्स पेरिश रेडी आहे तर....’