Join us

पीसी म्हणते,‘मुंबई हेच माझं घर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 10:46 IST

 प्रियांका चोप्रा ही सध्या अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ च्या दुसऱ्या  सीजनच्या शूटींगमध्ये बिझी आहे. बॉलीवूडमध्ये अशी अफवा पसरवण्यात आली ...

 प्रियांका चोप्रा ही सध्या अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ च्या दुसऱ्या  सीजनच्या शूटींगमध्ये बिझी आहे. बॉलीवूडमध्ये अशी अफवा पसरवण्यात आली आहे की, प्रियांका चोप्रा ही आता लॉस एंजलिसलाच स्थायिक होणार आहे. मात्र, आज ती बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे आणि ‘मुंबई हेच माझं घर आहे’ असे सांगितले आहे.‘ मुंबईसोडून मी कुठे जाणार? इथेच माझ्या करिअरला, जडणघडणीला सुरूवात झाली. मुंबईविषयी मला विशेष आस्था आहे. जी इतर कुठेही मला अनुभवायला मिळणार नाही. ’पीसीच्या जवळच्या मित्राकडून कळाले आहे की, असा काहीही प्लॅन पीसीचा नाही. तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे की,‘आय रिअली वेक अप टू सच अम्युझिंग न्यूज समटाईम्स. आय अ‍ॅम फिल्मिंग क्वांटिको इन माय होम इज मुंबई. नो एलए  इन द पिक़’