Join us
Daily Top 2Weekly Top 5

पीसी, डिप्पीची ब्रँड व्हॅल्यू वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2016 16:50 IST

बॉलीवूडच्या अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोन यांची ब्रँड व्हॅल्यू दिवसेंदिवस वाढते आहे. प्रियंकाने हॉलीवूडमध्ये ४० दिवसात २४ जाहिरातीचे ...

बॉलीवूडच्या अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोन यांची ब्रँड व्हॅल्यू दिवसेंदिवस वाढते आहे. प्रियंकाने हॉलीवूडमध्ये ४० दिवसात २४ जाहिरातीचे शुटींग केले. यापोटी तिला तब्बल १०० कोटी रुपये मिळाले. ३३ वर्षीय पीसी ज्यावेळी भारतात परत आली, तिच्या चेहºयावर ही धावपळ दिसत होती. हॉलीवूडमधील तिचे यश हिंदी चित्रपटातही दिसेल काय? हे सांगता येत नाही. प्रियंकाला जरी जाहिराती मिळाल्या असल्या तरी ती मुळची बॉलीवूड अभिनेत्री आहे, हे विसरता कामा नये, असे नादिया चौहान यांनी सांगितले.दीपिका सध्या हॉलीवूडमधील ‘एक्सएक्सएक्स: द रिटर्न आॅफ झांडर केज’ या पहिल्या चित्रपटात व्यस्त आहे. हे भारतीयांसाठी हे ब्रँडींग आहे. लोक पहिल्यांदा पिकू, बाजीराव मस्तानी हे चित्रपट पाहतील आणि नंतर हॉलीवूड चित्रपट पाहतील. हॉलीवूड मोठे चित्रपट बॉलीवूडमध्ये भाषांतर करुन वापरत नाही.